Home नागपूर नागपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी जाहीर

नागपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी जाहीर

76

नागपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी जाहीर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अध्यक्ष- सुनिल कुरेवार ,सचिव हरिभाऊ खोडे_

गजानन ढाकुलकर

हिंगणा- नागपूर जिल्हा ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची निवडणुक अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक संयुक्त महामंडळाचे राज्याध्यक्ष मारोती खेडेकर यांचे मार्गदर्शनाखली मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रशेखर झाडे व सहाय्यक यशवंत डोंगरे यांचे उपस्थितीमध्ये अविरोध संपन्न झाली.

नवनियुक्त कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्षपदी सुनिल कुरेवार,कार्याध्यक्षपदी राम बांते ,प्रसिद्धीप्रमुख व प्रवक्ता पदावर सज्जन पाटील तर सचिव पदावर हरिभाऊ खोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्षः सुनील कुरेवार,भिवापूर, कार्याध्यक्ष- राम बांते ,सावनेर, सचिव – हरीभाऊ खोडे,मौदा, प्रवक्ता व प्रसिद्धी प्रमुख, सज्जन पाटील, कुही, उपाध्यक्ष पदावर ज्ञानेश्वर गलांडे, कुही, पुरुषोत्तम कामडी,हिंगणा, युवराज शंकरापुरे,रामटेक, पौर्णिमा मेश्राम, कळमेश्वर, कोषाध्यक्ष- विलीन आरघोडे,नरखेड,सहसचिव- आंनद गाणार,नागपूर, अनिल गिरी, कळमेश्वर, सुरेश बोबडे,नरखेड,संघटन सचिव- गोवर्धन बुटे,अरविंद सपाटे ,कामठी, राजेंद्र तिडके,उमरेड, लिलाधर चौधरी ,महिला संघटक – माधुरी कन्नाके,सावनेर, चंदा खुसपरे, कळमेश्वर,विद्या समिती- उन्मेश शेंभेकर, नरखेड, छाया गिलोरकर, ,जिवती निंबाळकर, आदिवासी प्रतिनिधी- गजानन टावरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

श्री निकेतर माध्यमिक विद्यालय येथे झालेली आमसभा अशोक गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून भागवत माटे, कृष्णकांत पांडव, अशोक गोरे, चंद्रशेखर झाडे, यशवंत डोंगरे, मधुकर झलके , कोठीराम सयाम, प्रमोद कावरे यांची निवड झाली. संचालन राम बांते यांनी केले. याप्रसंगी सिद्धार्थ गजभीये ,शालिनी बाभुळकर,प्रभावती कोलते,राजु अडयाले,ज्ञानेश्वर गलांडे ,सुरजसिंग राठोड ,दादाराव शहारे,विलास मस्के ,गजानन ठावरी,विनायक ढबाले ,प्रमोद खडसे,अंकुश वासाड ,व प्रदिप गोसावी,प्रदिप गिदमारे,गणपत निनावे ,राजेश कोकुड्डे,सचिन इंगोले,लिलाधर चौधरी,सुनिल सवाई ,अरविंद सपाटे ,ज्योती राऊत,कोठीराम सयाम,व आरिकर उपस्थित होते.