Home देश विदेश पंतप्रधानांनी माझं १ तास १५ मिनिटे १३ सेकंदांचं भाषण ऐकलं!

पंतप्रधानांनी माझं १ तास १५ मिनिटे १३ सेकंदांचं भाषण ऐकलं!

52

पंतप्रधानांनी माझं १ तास १५ मिनिटे १३ सेकंदांचं भाषण ऐकलं!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली आठवण_

मुंबई: दादरच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे रात्री उशिरा झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीचा किस्सा आवर्जून सांगितला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या मुंबई भेटीदरम्यान मला पत्रकारांनी मला पंतप्रधानांशी झालेल्या भेटीबद्दल विचारले. तेव्हा मी सांगितले की, मोदींजींनी मला स्वतः सांगितले, आपका १ घंटा १५ मिनिट १३ सेकंद का भाषण मैने सुना. आपने दिलसे बात की. मी त्यांना म्हणालो की, मै कागज लेके आया था भाषण के लिए लेकीन वो बाजुमे करके मै बोला. एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत झालेले ते भाषण प्रचंड व्हायरल झाले होते. लोकांनी त्या भाषणाचा खूप आनंद घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यासंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान व्हायचा तेव्हा आम्हाला मूग गिळून गप्प बसून राहावं लागायचं, हिंदुत्वाविरुद्ध बोलले जायचे तेव्हा आम्हाला बोलता येत नसे. औरंगाबादचे संभाजीनगर कधी केले तर हिंदुत्वाचा झेंडा आम्ही फडकावला तेव्हा. शेवटच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही (उद्धव ठाकरे सरकारने) निर्णय घेतला. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही स्वागत केले. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेला पण आम्हाला टोमणे मिळाले. डुकरं काय, कुत्रे काय, सुपारी घेतली काय, रेडे काय, कामाख्या मातेला बळी द्यायला ४० रेडे पाठवलेत. पण कुणाचा बळी घेतला? तर महाविकास आघाडीचा बळी कामाख्या मातेने घेतला. जनतेला ते आवडले नव्हते. तिलाही आवडले नव्हते.

*पंढरपूर तिरुपती बालाजीसारखे होईल*

आपण घेतलेली विकासाची भूमिका लोकांना मान्य आहे. पंढरपूर हे तिरुपती बालाजीसारखे झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा विकास आराखडा तयार करायला सांगितला आहे. पांडुरंग हे सर्वांचे दैवत आहे.