
अमरनगर ते हिंगणा ग्रामीण रुग्णालयपर्यंत बस सुरू करण्याची मागणी
गजानन ढाकुलकर
हिंगणा – भारतीय जनता युवा मोर्चा डिगडोह मंडळ उपाध्यक्ष कमलेश खोब्रागडे यांच्या मार्फत परिवहन विभाग नागपूर महानगर पालिका येथे निवेदन देण्यात आले व यावेळी नागरिकांची होणारी पायपीट जसे की अमरनगर, नीलडोह येथील नागरिकांना तहसीलच्या शासकीय कामा करिता तसेच दिवाणी न्यायालयाच्या कामा करिता, बँकेच्या कामा करिता, बाजारा करिता, शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्या करिता तसेच शासकीय रुग्णालयात जा- ये करण्या करिता खूपशी पायपीट करावी लागत आहे. व येथून हिंगण्याला जाण्या करिता कुठलीही सोय उपलब्ध नाही आहे.व येथील लोकसंख्या लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांची व नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता ही बाब प्रशासकीय अधिकारी परिवहन विभाग यांच्या लक्षात आणून दिली व त्यावर त्वरित श्री. रवींद्र जी पागे प्रशासकीय अधिकारी परिवहन विभाग नागपूर व श्री.गिरीश महाजन पर्यवेक्षक परिवहन विभाग नागपूर यांनी ही सुविधा लवकरच सुरू करून देऊ असे आश्वासन दिले यावेळी कमलेश खोब्रागडे , ओमप्रकाश वैद्य, विलास राऊत, अजय रडके, अजय रहिले, राज गायधने, मंगल शर्मा व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.