वानाडोंगरीत नगराध्यक्षाच्या पतीला माजी सैनिकाने दिला चोप

वानाडोंगरीत नगराध्यक्षाच्या पतीला माजी सैनिकाने दिला चोप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा – वानाडोंगरी नगर परिषदच्या नगराध्यक्षा वर्षा सतीश शाहाकार यांचे पती सतीश भाऊराव शहाकार प्रभाग क्र.7 साई कॉलनी ठाकरे ले-आऊट मधील माजी सैनिक गोपाल ठाकरे यांच्या घरासमोर काही नगर परिषद कर्मचारी व नगरसेवक यांच्या सोबत काही नालीचे बांधकाम करण्याच्या हेतूने गेले असता गोपाल ठाकरे यांनी सतीश शहाकार यांना आपण कोण आपण कोणी पदाधिकारी नाही आपण आपल्या नगराध्यक्षा असलेल्या पत्नीच्या कामात का लुडबुड करता या वरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याची वार्ता परिसरात सुरू आहे.

यावरून माजी सैनिकाला शहाकार यांनी वाईट हेतूने थोडे घेरले त्यावर सैनिकाने आपल्या सुरक्षा करिता आव-डाव पाहून सतीश शहाकार यांच्या कंबरेखाली जोरात लात मारली व शहाकार खाली पडले.आपली त्यातून कशीबशी सुटका करून घेतली खाली पडलेल्या सतीश शाहाकार यांनी ठाकरे यांच्या दिशेने भला मोठा दगड फेकून मारला सुदैवाने कोणाला लागला नाही.

हा सर्व प्रकार सैनिकाच्या घरी असलेल्या CC TV कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सुद्धा कळले आहे.पण सैनिकाने सध्यातरी समजूतदार पणा ठेऊन याबाबत कोणतीही तक्रार केली नसून वानाडोंगरी शहरात या बाबत मोठी खमंग चर्चा नागरिकात सुरू आहे.

मुख्याधिकारी यांनी या आधीच महिला पदाधिकारी यांच्या पतींना कार्यालयात येऊन कोणत्याही कामात ढवळा-ढवळ न करण्या करिता नोटीस पत्र दिले आहे. तरी पदाधिकारी प्रभागात फिरून आपल्या पत्नीच्या कामात लुडबुड करतात त्यामुळेच हा प्रकार घडला आहे. तरी मुख्याधिकारी यांनी पुन्हा नगराध्यक्ष , नगरसेविका यांच्या पतींना स्मरण नोटीस देणे आवश्यक आहे. अशी जागरूक नागरिकांची इच्छा आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles