Home ताज्या घटना सावनेरचे ‘शवगृह’ मृतावस्थेत; शवागर सोसतेय हाल

सावनेरचे ‘शवगृह’ मृतावस्थेत; शवागर सोसतेय हाल

63

सावनेरचे ‘शवगृह’ मृतावस्थेत; शवागर सोसतेय हाल



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर – सावनेर तालुक्यातील बरेच मृतदेह इथं येत असतात. शेवटच्या क्षणी मृतदेह घेऊन जाताना तिथल्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून , तिथे येणाऱ्या डॉ. पोलीस अधिकारी, मर्च्युरीचे कर्मचारी, आणि मृतकाचे नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे, कित्येकदा तिथे, रस्त्यावर मृतकाचे नातेवाईक पाय घसरून पडलेलं आहेत.

तिथे वाढलेले झुडपे,तिथे पडलेली भिंत,तिथे मृतकाचा नातेवाईकांना होणारा त्रास,खरंच खूप दुःखदायक आहे. किमान आपण शेवटच्या क्षणी तरी , त्यांना त्रास होणार नाही,याची काळजी घेणे गरजेचं आहे.
मृतदेह घेऊन जातांना, एकदा पाय घसरला आणि तोल जाऊन मृतदेह हा खाली पडला. हा शवागरच मृतावस्थेत असल्याचे चित्र सावनेर येथे निदर्शनास आले.

स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन नक्कीच काही उपाय योजना कराव्यात अशी कळकळीची विनंती प्रशासनाला सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी केली आहे.