
शेतकरी वर्गावर तरवा टंचाईचे संकट
_तरवा मिळवण्यासाठी बळीराजाची धावाधाव_
सुभाष चौगले, कुडूत्री(प्रतिनिधी)
कोल्हापूर: या वर्षी शेतकरी वर्गावर भात आणि नाचना तरव्याचे संकट जाणवणार असून शेतीक्षेत्र लागणीविना पडून राहणार आहे.शेतकरी वर्गावर तरवे शोधण्याची वेळ आली आहे.बळीराजा मात्र या संकटाने हवालदिल झाला आहे.
या वर्षी मृग नक्षत्रात पाऊस न झाल्याने तसेच पेरलेले तरवे रानातील पाखरांनी फस्त केल्याने तरवा संकट ओढवले आहे.त्यातच अचानक जोरदार पाऊस आणि त्याच्या भडीमाराने तरवे भुईसपाट झाले आहेत.त्यांची उंची ही खुंटल्याने तरवा पुरवठा साधला जात नाहीत. पिवळसर देखील झाले आहेत व
निर्माण झालेले तरवा संकट यामुळे बळीराजाने शेती क्षेत्र लागणीविणा पडून राहणार असल्याने बळीराजा चिंतेत आहे.तरवा मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत असून मित्र मंडळी,पै पाहुणे,नातेवाईक,तरवा मिळवण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. निश्चितच या वर्षी शेती क्षेत्र लागणीविना पडून राहणार आहे