जामठा गावाला प्रथमच आपली बसचे दर्शन!

जामठा गावाला प्रथमच आपली बसचे दर्शन!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव नागपूर

नागपूर:-एकीकडे देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे तर दुसरीकडे मात्र बऱ्याच गाव,वस्त्या तांड्यांना हक्काचं परिवहन असलेल्या बस चे दर्शन सुध्दा झाले नाही. जामठा क्रिकेट स्टेडियम मुळे जागत नाव असलेले जामठा गाव सुध्दा याला अपवाद नव्हते, परंतु गावातील सामाजिक कार्यकर्ते ताराचंद रोकडे यांना हि बाब वारंवार खटकत होती, त्यांनी माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या हि बाब लक्षात आणून दिली.

आमदार बावनकुळे व आमदार सावरकर यांनी नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या आपली बस च्या व्यवस्थापकांशी चर्चा करून जामठ्याचा मार्ग आपली बस साठी मोकळा करून दिला आणि नागरिकांच्या चहऱ्यावर हास्य फुलले,बस सुरू झाल्याने याचा फायदा विद्यार्थ्यांना तर होणारच पण गरजू नागरिकांना सुध्दा होणार आहे.गावत बस येताच नागरिकांनी मोठ्या आनंदाने बसची आरती ओवाळून पुजा केली व वाहक,चालक यांचाही सत्कार केला.

ही बस सिताबर्डी ते जामठा, संदेश सिटी, वृंदावन सिटी अशी धावणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ताराचंद रोकडे यांनी केले, यावेळी सरपंच रेखा देवगडे, उपसरपंच कौशल्याबाई रोकडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश टेकाम, धनराज ढगे,विनोद जयपूरकर,दुर्गा हिंगे,शिल्पा पोटफोडे, संगिता मेश्राम, ग्रामसेवक शैलेंद्र टेंभुर्णे कर्मचारी नागेश सातपुते,व जामठा, संदेश सिटी, वृंदावन सिटी चे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles