सुख शांती समाधान संस्थेतर्फे गुरु पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

सुख शांती समाधान संस्थेतर्फे गुरु पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: वर्धा रोड रहाटे कॉलनीत १७ जुलै रोजी नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात साईकृपा मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते १२ यादरम्यान गुरु पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि गुरु श्री सचिनजी माथुरकर यांच्या शुभ आगमनाने त्यांचे औक्षण करून मंचावरील स्वागत केले आणि त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

नंतर त्यांना स्थानबद्ध करून त्यांची सध्या विधीवत पूजा करून सुनील पोतदार, मोनाताई पोतदार यांनी केली. त्यानंतर स्वागत गीत अंतर्गत जास्मिन व नक्षत्रा यांनी राधाकृष्णन यांचे सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर गुरुतत्त्वावर केळापुरे ताई, स्वरूप दादा गुप्ता, व नीताताई गेडाम यांनी भाष्य केले. नऊ रसांवर, नऊ ठिकाणच्या शिबिरांचा टीमने खूपच छान सादरीकरण केले.

यासाठी पल्लवीताई भालेराव ने महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. गुरुमाऊली सचिन माथुरकर यांनी सगळ्यांना मार्गदर्शन करून माथुरकरांनी यावर खूप छान माहिती दिली. त्यांनी चार वाणीचें महत्व सुद्द्धा यावेळी सांगितले. नंतर गुरु माऊली ने ओंकार घेतला. नंतर सर्व शिष्य मंडळींनी ग्रुप प्रमाणे गुरुपूजन केले. आणि गुरुमाऊलीचे आशीर्वाद घेतले. प्रोजेक्ट डायरेक्ट बिंदीताई मुरकुटे हिने क्षमा गीत गाईले. व यावेळी सर्वांचे आभार मानले. नंतर प्रसाद ग्रहणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमांचे सूत्र संचालन सौ. रानी मोरेने केले. आयोजित कार्यक्रम पूर्णपणें यशस्वी करण्यासाठी आपआपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात. म्हणूनच या सर्वांच्या जिद्दीनेच गुरुपुजनाचा कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी 200 ते 250 च्या घरात लोकसंख्येने सहभाग घेतलेला होता. असे सचिव शिला केळापुरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles