‘माय मराठी’चे महत्त्व कधीच कमी होणार नाही

‘माय मराठी’चे महत्त्व कधीच कमी होणार नाहीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“कबूतराला गरुडाचे पंख लावता येतीलही,
पण, गगन भरारीचंं वेड रक्तातच असावं लागतं
कारण आकाशाची ओढ प्रवृत्तीतच हवी ,
ती कधीही दत्तक घेता येत नाही.”

खूप दिवसापासून थिजलेली लेखणी आज पुन्हा हातात घेतली. खरं तर माझ्या अंतर्मनानेच ती घ्यायला लावली, निमित्त आहे… ‘मराठीच्या शिलेदार’ प्रकाशनाचा पन्नासावा साप्ताहिक ‘साहित्यगंध’. लेखणी हातात घेतल्याबरोबर व.पुं.च्या वर सुरुवातीला उल्लेख केलेल्या ओळी आठवल्यात. मराठीच्या सक्षमीकरणासाठी राबणाऱ्या हातांना आपल्या शब्दाचं किमान बळ तरी द्यावं हा विचार मनात घोंघावला. विचारांचं चक्र सरळ मला साप्ताहिक साहित्यगंधच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाकडे घेऊन गेले. त्यावेळी विचारही केला नव्हता, की एवढ्या लवकर आपण पन्नासाव्या अंकापर्यंत पोहोचू. अर्थात, समूहाच्या या प्रवासात अनेक अडथळे आलेत हे निश्चितच, परंतु मराठीच्या शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांच्या जिद्दीपुढे पुन्हा एकदा सर्व काही हरलं आणि त्यांची जिद्द जिंकली. कारण गगनभरारीचे वेड त्यांच्या रक्तातच आहे.

“धावत जावे ध्येयाकडे आणि उगाच मिठीत घ्यावं !!
पायात रुतलेल्या काट्याला सहज विसरून जावं !!
आठवणीत ठेवावं ते कष्ट त्याला पुन्हा पुन्हा गिरवावं!!
कितीही घेतली भरारी तरी मन जमिनीवर राहावं!!”

आदरणीय राहुल सरांमधील सातत्याला त्रिवार वंदन. या निमित्ताने मला आठवलेत ते मराठीचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी वाघिणीचे दूध म्हणविल्या गेलेल्या इंग्रजी भाषेच्या आगमनाच्या काळात मराठी भाषेचे व्याकरण वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी लिहून ते पूर्ण करणारे व इंग्रजी भाषा शिकणाऱ्या मराठीच्या विद्यार्थ्यांना ती सोपी वाटावी या हेतूनं त्यांनी त्यांच्या ग्रंथाची रचना इंग्रजी व्याकरणाच्या पद्धतीने केली केवढी ही प्रचंड विद्वत्ता. तिच विचारसरणी, तिच बुद्धिमत्ता मी पुष्कळदा राहुल सरांमध्ये पाहते.

“मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान!
भजन कीर्तन भारुड ऐकताच हरपून जाते भान!
काना, मात्रा, वेलांटीचे मिळाले आहे वाण
साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान.”

माझी माय म्हणजे ….माय मराठी, मायेचा, ममतेचा, ठायी ठायी प्रत्यय देणारी, अंगभूत गोडवा असणारी अगदी भुई कमळासारखी उमललेली. आई मध्ये जशी विविध रूपे एकवटलेले असतात अगदी तशीच. अशा माय मराठीच्या संवर्धनाचा यज्ञ आरंभलेला, ‘मराठीचे शिलेदार समूह म्हणजे भाषा सक्षमीकरणाचे दुसरे नाव.’अनेक नानाविध उपक्रमांच्या माध्यमातून राहुल सर व सर्व प्रशासकीय टीम तन-मन-धनाने भाषेच्या यज्ञात कार्यरूपी आहुती देत आहेत.

सर्वांच्या वैविध्यपूर्ण विचारसरणीचा एक भाग म्हणजे ‘साप्ताहिक साहित्यगंध’ या प्रकाशनाद्वारे आम्ही आजपर्यंत अनेक नव साहित्याला मोठे व्यासपीठ मिळवून दिलेले आहे.

संत ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे…

माझा मराठीची बोलू कौतुके !
परी अमृतातेही पैंजासी जिंके !
ऐसी अक्षरे रसिके!!
मेळविन!

संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी ,श्री दासोपंत अशा अनेक संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आहे आणि साजरी गोजिरी बनवली आहे. अभंग, गवळण ,भारुडे बतावणी, ओव्या ,उखाणे यांचा साज चढवला .आपल्याला हीच परंपरा पुढे घेऊन जायची आहे.
आदरणीय राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठीचे शिलेदार’ समूह निश्चितच त्या दिशेने वाटचाल करीत आहे; हवी आहे आपल्या सर्वांची साथ. ज्या भाषेतलं वाङमय श्रेष्ठ, ती भाषा श्रेष्ठ., हा मूलमंत्र आहे. तेव्हा समृद्ध वाङमय निर्मितीची मराठीचे शिलेदार समूहाने दिलेली प्रत्येक संधी आपण सोनं म्हणून घेतली, तर माय मराठीचे महत्व कधीच कमी होणार नाही.

साहित्य निर्मिती बाबत सुद्धा व्यक्ती ,कुटुंब ,समाज आणि राष्ट्र यांच्या अवनतीला कारणीभूत होणारी साहित्य निर्मिती करण्यापेक्षा समाजाचा सर्वांगीण विकास होईल अशा साहित्याची निर्मिती करा हे आव्हान नेहमीच मी करत आलेली आहे. आज प्रकाशित होत असलेल्या साप्ताहिक साहित्यगंध निर्मितीमागे अनेक हात आहेत. प्रत्यक्ष परोक्ष रूपाने तुम्हा सर्वांची साथ हेच याच्या यशामागचे गमक आहे. तेव्हा ही साथ जर कायमस्वरुपी राहिली, तर ‘साहित्यगंधाची’ शतकपूर्ती आपणासाठी अवघड नाही. अंकासाठी साहित्यरुपी योगदान चालू ठेवा. आपल्या या ज्ञान, यज्ञातील लहान मोठ्या साहित्याला जगासमोर घेऊन जाण्याची जबाबदारी समूहाची, तुम्ही निश्चिंत रहा व वेगळे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा. या पन्नासाव्या अंकांच्या निर्मितीमागे संपादक मंडळाची ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ ही वृत्ती निश्चितच कारणीभूत आहे. तेव्हा पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे मी मनापासून ‘कार्यकारी संपादिका’ या नात्याने आभार मानते व भरभरून शुभेच्छा देते…!!

मुख्य कार्यकारी संपादिका
सविता पाटील ठाकरे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles