‘तिरंगा’ फडकविण्याचा नवा नियम

‘तिरंगा’ फडकविण्याचा नवा नियमपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल_

नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशाच्या ध्वजसंहितेत महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिवसा आणि रात्रीही तिरंगा फडकवता येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्ट या काळामध्ये ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणाही केली आहे.

शनिवार, २३ जुलै रोजी केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे महत्त्वाचे बदल आणि त्याची माहिती आता नागरिकांना तसेच सर्व शासकीय व खासगी कार्यालयांना देणे आवश्यक असणार आहे.

यापूर्वी केवळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकता येत होता. सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज फडकावण्यास परवानगी नव्हती. तसेच, मशीनने बनवलेले आणि पॉलिस्टर राष्ट्रध्वज लावण्याचीही परवानगी नव्हती. मात्र आता दिवसा आणि रात्री देखील तिरंगा फडकाविता येणार आहे. त्याचबरोबर पॉलिस्टरपासून तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करता येईल. यासाठी केंद्र सरकारने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याची घोषणाही केली आहे. या योजनेसाठी भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला आहे.

दरम्यान, ध्वज संहितेत केलेले बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व मंत्रालये आणि विभागांना पत्र पाठवले आहे. राष्ट्रध्वजाला वंदन करण्याचे नियम भारताच्या ‘ध्वज संहिता-२००२’ आणि ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा-१९७१’ अंतर्गत विहित केलेले आहेत. आता २००२ च्या ध्वज संहितेत सुधारणा करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles