Home नागपूर कॉंग्रेसतर्फे नागपूर जिल्हयातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा

कॉंग्रेसतर्फे नागपूर जिल्हयातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा

43

कॉंग्रेसतर्फे नागपूर जिल्हयातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव

नागपूर: दिनांक 24/07/2022 रोजी मा. आ. श्री नाना पटोले (अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची अतिवृष्टी पाहणी समितीचा नागपूर जिल्ह्यातील घोगली ता. नागपूर (ग्रामीण), कवठा ता. कामठी येथे अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मा.आ.श्री सुनिल केदार, (माजी मंत्री तथा समिती प्रमुख), मा.श्री. राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तथा माजी मंत्री) नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्यात आला.

या वेळी सौ. रश्मी बर्वे (अध्यक्ष नागपूर जिल्हापरिषद ), मा. श्री. वीरेंद्र जगताप (माजी आमदार तथा समिति सदस्य), मा.श्री. सुरेश भोयर, मा.श्री. रवींद्र दरेकर(समिति सदस्य),सौ. सुमित्रा कुंभारे(उपाध्यक्ष जील्हा परिषद नागपूर), मा.श्री.तपेश्वर वैद्य(जिल्हा परिषद सभापती कृषी), सौ. भारती पाटील(जिल्हा परिषद सभापति शिक्षण विभाग), सौ. नेमावली माटे(सभापति समाज कल्याण),सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस उपस्थित होते.