Home नागपूर ‘ओयो’ कुंटणखाने हटवा महाराष्ट्राची संस्कृती वाचवा

‘ओयो’ कुंटणखाने हटवा महाराष्ट्राची संस्कृती वाचवा

101

‘ओयो’ कुंटणखाने हटवा महाराष्ट्राची संस्कृती वाचवापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_महिला सेनेच्या नेतृत्वात राम जोशींना निवेदन._

नागपूर: शहरांतील दाट वस्तीमध्ये ओयो लॉजिंग कपल हॉटेल चालवत आहे. अल्पवयीन तरुण-तरुणी हॉटेलमध्ये येतात व येथे खूप मोठ्या प्रमाणात अश्लील व्यवसाय सुरू असतात परिणामी वस्ती मधील राहणाऱ्या महिला, मुली, नागरिकांवर याचा वाईट परिणाम होत आहे 24 तास लॉजिंग बोर्डिंगच्या नावाखाली परवाना घेऊन इथे वेश्या व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहेत.

हॉटेलला रहिवासी क्षेत्रामध्ये कपल हॉटेल चालवण्याची परवानगी आपल्या मनपा अंतर्गत दिली आहे का ?रहिवासी क्षेत्रामध्ये ओये व्यावसायिक व्यवसाय कसे करू शकतात ? पाश्चात्त्य संस्कृती रुपी ओयकुंटणखाने गल्लीगोळापर्यंत पोहोचले आहेत या व्यवसायात अनेक माफिया व गुंड प्रवृत्तीची लोक सुद्धा सहभागी आहे, महेर बाबा नगर, शाहूनगर येथील व्हाईट हाऊस मध्ये सुद्धा कपलची गर्दी असते व शहरातील अनेक वस्त्यांमध्ये लोकांचा विरोध असताना सुद्धा येथील सामाजिक स्वास्थ दूषित होत आहे.

नागरिकाचे आरोग्य सुद्धा धोक्यात आलेले आहेत व शिक्षित आणि चांगल्या घरातील मुलींना बाहेर पडण्यासाठी सुद्धा विचार करावा लागतो शहरातील सर्व निवासी क्षेत्रातील हा व्यवसाय अवैधरित्या सुरू आहे शासनाच्या एकाही विभागाची यांना परवानगी नाही, इमारती निर्धारित उद्देशाने प्राधिकरणाकडून मंजूर केलेल्या नाही.

शहरातील ओय हॉटेल्स अटी व शर्तीचे पालन होत नसल्याबाबत सुद्धा पोलिसांनी आम्हाला पत्र दिलेले आहेत यावरून लक्षात येते की रहिवासी क्षेत्रामध्ये जे व्यवसाय यांनी सुरू केलेले आहेत ते अनाधिकृत आहेत त्यामुळे आपल्या विभागातर्फे संपूर्ण शहरातील ओयो लॉजिंग बोर्डिंगच्या हॉटेलचे ऑडिट करण्यासंबंधीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त राम जोशी साहेबांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष मनीषा पापडकर, जिल्हाध्यक्षां अचलाताई मेसन, उपाध्यक्ष पूनम चाडगे, विभाग अध्यक्ष दक्षिण मंजुषा पानबुडे, दक्षिण सचिव दिपा चिरकुटे उपस्थित होत्या.