या खड्ड्यांचे करायचे तरी काय?

या खड्ड्यांचे करायचे तरी काय?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भंडारा : पावसाळा सुरू झाला की, आपोआप सर्व प्रमुख रस्त्यांसह छोट्या-मोठ्या रस्त्यांवर अचानक खड्ड्यांचा जन्म होतो आणि सुरू होतो खड्डेमय आयुष्याला सुरुवात. सकाळी उठल्यापासून कार्यालय किंवा कामाचे ठिकाण गाठण्यासाठी प्रत्येकाला करावी लागणारी तगमग आणि खडतर प्रवास पाहिला की आयुष्य जणू खड्ड्यातच गेला की काय असे वाटते. महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख असून भंडारा जिल्ह्यात अनेक गावे ग्रामीण भागात मोडतात. अशा ग्रामीण भागातील गावात व आसपासच्या भागातील रस्ते हे एकतर खड्ड्यांमध्ये गेलेले असतात किंवा रस्त्याची चाळण झालेली असते. या अशा खड्डेयुक्त रस्त्यांवरचा प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवासांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. हा त्रास अलीकडचा नसून कित्येक वर्षापासून रस्त्यावरील खड्डे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटकच बनला आहे. जणू दरवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची होणारी दुरवस्था, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, परिणामी नागरिकांना त्याचा बसणारा फटका आणि काही मिनिटांच्या अंतरासाठी लागणारा एका तासापेक्षा अधिक वेळ अशा बिकट परिस्थितीचा सर्वसामान्यांसह सर्वजण नेहमी सामना करत असतात.

*भ्रष्टाचारामुळे रस्त्यांची चाळण*

शहर असो की गाव, हमरस्ता असो की महामार्ग, पावसाला सुरू झाला की रस्त्याची चाळण ठरलेली असते. आताही रस्त्यांची तीच अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. रस्त्यांची फार चाळण झाली. मात्र लोकप्रतिनिधी त्याकडे पाहण्याची स्वारस्य दाखवत नाही. रस्त्यावरील खड्डे तर वाहन चालकांची परीक्षा पाहणारे आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. खड्ड्यात गाडी घसरून अनेकदा अपघात होतात. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास तर सहन करावा लागतोच शिवाय वाहतूक कोंडी होते. दरवर्षी रस्त्यांची चाळण होत असताना यावर कायमचा तोडगा किंवा उपाय योजावेत असे प्रशासनाला वाटत नाही. हा निष्काळजीपणा नव्हे काय? रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण प्रत्येक वर्षी होते. पण या कामाचा दर्जा फारच खालच्या स्तराचा असतो. या रस्त्याच्या कामकाजाची चौकशी होणे गरजेचे आहे. थोड्याशा पावसाने जर रस्ता उखडत असेल तर कामाच्या दर्जावर संशय आल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचार हेच यामागचे मुख्य कारण आहे. लोकप्रतिनिधी कंत्राटदार आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळेच रस्त्यांची दरवर्षी चाळण होते. ही अभद्र युती वाहनचालकांच्या जीवावर उठली आहे. नव्या सरकारने तरी या अभद्र युतीचा बिमोड करून वाहनचालकांना दिलासा द्यावा.

*सक्रिय जनसहभागाशिवाय समस्या सुटणार नाही*

दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून अपघात होणे हे नित्याचे झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढतो आणि चालकांना मणक्यासारख्या अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. या विषयावर इतकी वर्ष बोलून लिहून व करूनही फारसा फरक पडलेला नाही. उन्हाळ्याच्या शेवटी केल्या जाणाऱ्या रस्ते दुरुस्तीच्या कामात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नोकरशहांकडून भ्रष्टाचार केला जातो, हे उघड गुपित आहे. हे टाळण्यासाठी रस्ता दुरुस्तीच्या कामांमधील तांत्रिक माहिती समाजधुरीणांनी तज्ज्ञांमार्फत करून घ्यावी. प्रत्यक्ष काम होतांना माहिती अधिकारामार्फत त्याच्यावर नजर ठेवून ते पारदर्शक पद्धतीने होईल अशी खबरदारी घ्यावी. सक्रिय जनसहभागाशिवाय ही समस्या कायमची सुटणार नाही.

*रस्ता आहे की खड्डा? यास मंत्री जबाबदार*

शहर असो किंवा गाव असो, पाऊस पडला की खड्डा हा पडतोच. खड्डे पडल्यावर तक्रारी दाखल केल्या जातात. पण काही दिवस गेले की, येरे माझ्या मागल्या. अशी रस्त्यांची गत झाली आहे. कोणीही रस्त्यांना व त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांना वाली उरला नाही. यात मात्र जनतेचा ‘रगडा पॅटीस’ होताना दिसत आहे. जर या कामासाठी जागरूकता दाखवली तर असे होणार नाही. दहा वर्षांची कामे जर एक दोन वर्षात केली तर पावसामुळे रस्ते खराब होणार. यास भ्रष्टाचारही कारणीभूत असून याला निवडून आलेले लोकप्रतिनिधी, सरकारी नोकर व मंत्री जबाबदार आहेत. सतत गोष्टी, हलक्या सोप्या करण्यास भर देणारा समाज कधीही प्रगती करू शकत नाही. स्वतःच्या स्वभावाशी प्रमाणिक राहून स्वतःला झोकून देऊन काम करणे हाच सर्वोच्च धर्म आहे. हे अधिकारी, कंत्राटदारांनी लक्षात घेतले तर रस्त्यांची वाईट अवस्था होणार नाही.

*बेजबाबदारांना शासन झाले पाहिजे*

रस्ते बांधणे, त्यांची देखभाल करणे, खड्डे पडल्यास ते दुरुस्त करणे हे त्या संबंधित विभागाची जबाबदारी असते. त्यासाठी वाहनधारकांकडून कर वसूल केला जातो. चांगले दर्जेदार व लवकर खराब न होणारे रस्ते बांधणे सहज शक्य आहे. परंतु संबंधित विभागातील अधिकारी जाणूनबुजून तकलादूर रस्ते बांधतात. त्यामुळे रस्ते लवकर खराब होतात व दुरुस्तीची कंत्राटे निघतात. खड्डे नाहीत असा एकही रस्ता शोधून सापडणार नाही. या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होते. केवळ नाईलाज म्हणून कुणी हौशी गावनेता मुरूम फावडा घमेले घेऊन खड्डे बुजवतात. पादचारी, दुचाकीस्वार खड्ड्यात पडून अपघात होतात. वाहने खराब होतात. इंधन वाया जाते. हे सर्व थांबवायचे असेल तर संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांना त्यांच्या बेजबाबदारापणाबद्दल कडक शासन झाले पाहिजे. त्याशिवाय रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या सुटणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles