नवीन सरकारमधील अनेकांची राक्षसी महत्वाकांक्षा; उद्धव ठाकरे

नवीन सरकारमधील अनेकांची राक्षसी महत्वाकांक्षा; उद्धव ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, ४० आमदारांचं बंड आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या सरकारवर भाष्य केलं. राक्षसी महत्त्वकांक्षा, हावरटपणा अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर नामोल्लेख न करता टीकेचे बाण सोडले. यावेळी ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दलही भूमिका मांडली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली. कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणाबद्दल आणि एकनाथ शिंदेंच्या बंडावर दीर्घ भाष्य केलं.

संजय राऊत – तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं?
उद्धव ठाकरे – दोन गोष्टी आहेत. समजा मी त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं. त्यांनी आणखी काहीतरी वेगळं केलं असतं. कारण त्यांची भूकच भागत नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय? शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात? ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात. म्हणजे दिलं तरी माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, इथपर्यंत होतं. आता याचं तेही माझं आणि त्याचं तेही माझं. इथपर्यंत यांची हाव गेली आहे. या हावरटपणाला काही सीमा नसते.

संजय राऊत -…की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला?
उद्धव ठाकरे – “महाविकास आघाडीचा प्रयोग जर का चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. जनतेनं उठाव केला असता. तसं झालं नाही. जनता आनंदी होती, कारण आल्या आल्याच आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं. त्यानंतर मी अभिमानानं सांगेन की, कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रशासनानं आणि जनतेनं उत्तम सहकार्य केलं. म्हणून आणि म्हणूनच देशातील ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं… मी माझं नाव नाही म्हणत, पण जनतेचा मी प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. जर समजा या सगळ्यांनी सहकार्य नसतं केलं, तर मी कोण होतो? मी एकट्याने काय केलं असतं? बरं, मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो. कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles