भारतरत्न डॉ. ए. .पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

भारतरत्न डॉ. ए. .पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_न्यू मून इंग्लिश मिडियम स्कूल येथे आमदार चंद्रिकापुरे यांची विशेष उपस्थिती_

तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: भारताचे ११ वे राष्ट्रपती मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त न्यू मून इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज अर्जुनी मोरगाव जि गोंदिया येथे संस्थाध्यक्ष आ. यशवंत परशुरामकर, आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे (अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्र) व लोकपालजी गहाणे (राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष) व संस्था पदाधिकारी प्राचार्य ओमप्रकाशसिंह पवार यांच्या विशेष उपस्थितीत डॉ. कलाम यांच्या फोटोला माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

‘डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे विज्ञानाप्रती, देशाप्रती, समाजाप्रती वाहिलेले अग्निकुंड आहे. मिसाईल क्षेपणास्त्र स्वतः बनवून देशाला अवकाश क्षेत्रात विशिष्ट उंचीवर नेणारे थोर शास्त्रज्ञ, भारताला महासत्ता बनवण्याच्या स्वप्नाने भारलेले व संपूर्ण युवकांना देशकार्यासाठी जोडणारे एक महान व्यक्तिमत्त्व आहे.

या पुण्यतिथीच्या निमित्ताने आमदार चंद्रिकापुरे यांनी ज्युनियर कॉलेजच्या विदयार्थ्यांशी प्रत्यक्ष हितगुज करुन अभ्यासासाठी व देशकार्यासाठी प्रेरीत केले. संस्थाध्यक्ष परशुरामकर यांनीही डॉ. कलाम यांचा आदर्श पुढे ठेवून आपणही समाज व देशाप्रती उत्तम कार्य करावे असे आवाहन केले. व खरी आदरांजली वाहिली.

राष्ट्राभिमान व देशनिष्ठा जागी होईल असे गीत गायन करण्यात आले. व ‘राष्ट्रनिर्मितीत युवकांचे योगदान’ या विषयावर निबंधस्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाल आदरांजली वाहण्यासाठी प्रा. राकेश उंदिरवाडे प्रा. सचीन मेश्राम, प्रा. सौ. तारका रुखमोडे, सौ.इर्लेकर, सौ.चचाने , कु. बडवाईक, कु. राऊत, कु. लांजेवार श्री.बांडे यांनी परिश्रम घेतले प्रा. तारका रुखमोडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles