गुरुकूल कॅम्पस येथे पदग्रहण सोहळा संपन्न

गुरुकूल कॅम्पस येथे पदग्रहण सोहळा संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: सालई गोधनी, येथे नुकत्याच झालेल्या २१ जुलैला कै.म.ल.मानकर स्कूल (गुरुकूल कॅम्पस) येथे इन्व्हिसटीचर सिरेमणी (पदग्रहण सोहळा),घेण्यात आली. यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्षा वैदेही भाटे, होत्या. प्रमुख अतिथी प्रगती मानकर , दिपक संगावार, हे होते. तसेच शाळेच्या संचालिका डॉ. अपेक्षा गोतमारे, प्राचार्य अमोल भोंगाडे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे बॅचेस देऊन पाहुण्यांच्या हस्ते स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

शाळा प्रमुख युगंत गायकवाड, उपनायक कु.अनुष्का भगत, शिस्तप्रमुख इशांत खंडाते, क्रीडा प्रमुख सुजल संकाडे, स्वच्छता प्रमुख ओम ठाकरे या विद्यार्थांचे सर्वसमक्ष शपतविधी घेण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पृथ्वी, जल, अग्नी, वायू विध्यार्थानी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होता.

अध्यक्षा प्रगती मानकरनीं सर्व विद्यार्थांचा कौतुक करुन तुमच्यातील सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी ही शाळा प्रयत्नशील आहे. व सर्वांचा सहकार्य असणे गरजेचे आहे. असे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. प्रमुख अतिथी वैदेही घाटे यांनी निसर्गरम्य वातावरणात मुलांचे प्रात्यक्षिक पाहताना मलापण हेवा वाटतो. आणि जल, वायू, अग्नी, हे काय दर्शिविते हे आपल्या वक्तृत्वातून मौलिक विचार मांडले तसेच सर्व विध्यार्थ्यांचे कौतुक केले.

यामध्ये प्राचार्य अमोल भोंगाडे यांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडली व या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमांचे संचालन पंकज वाढई यांनी केले तर आभार जयश्री खोंडे यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षिका व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles