नागपुरात उद्या आरक्षण सोडत; ओबीसीच्या जागा घटणार

नागपुरात उद्या आरक्षण सोडत; ओबीसीच्या जागा घटणारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: सर्वोच्च न्यायालयाने नगरपालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाले असून येत्या गुरुवारी ओबीसी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपालिकेच्या मागील निवडणुकीच्या तुलनेत आगामी निवडणुकीत ओबीसींच्या राखीव जागांची संख्या घटणार आहे. २०१७ मध्ये कामठी नगरपालिकेत नगरसेवकांची संख्या ३२ होती. यात ५ महिलांसह ओबीसीचे ९ नगरसेवक होते. २०२२ च्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढली असून ३४ होणार आहे. २ नगरसेवक वाढले, परंतु ओबीसी नगरसेवकांची संख्या कमी होऊन ती ६ राहणार आहे.

महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी पालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बांठिया आयोगाच्या ओबीसी आरक्षण बाबतच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देताच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मागील जाहीर आरक्षण सोडतीनुसार एकूण सदस्य संख्या ३४ त्यातील ५० टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव असल्याचे गृहीत धरून उर्वरित १७ जागेसाठी आरक्षण काढण्यात आले होते. त्यामध्ये १० जागा अनुसूचित जाती तर १ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होत्या, तर उर्वरीत सहा जागा ह्या सर्वसाधारण महिला व सर्वसाधारणसाठी आरक्षित होते. यानुसार जाहीर झालेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणला कुठलाही धक्का न लावता आरक्षण काढतेवेळी ६ जागेवर आरक्षण निघणार आहे.

यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील ६ ईश्वरचिठ्या सोडण्यात येतील. त्यातील तीन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलासाठी ईश्वरचिट्ठी काढणार आहेत. त्यातील उर्वरित तीन हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ठरतील. या सहा प्रभागात प्रभाग क्र १, २,६,७,८ व ११ यांचा समावेश राहणार आहे. या सहा प्रभागासाठी ओबीसी आरक्षण निघणार असल्याचे बोलले जात आहे.

*आरक्षण :प्रवर्ग टक्केवारी जागा*

ओबीसी ६

अनुसूचित जाती १०

अनुसूचित जमाती १

एकूण५० टक्के १७

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles