“नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी वाडी शहराची लावली वाट’; विकास झाला भकास”

“नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी वाडी शहराची लावली वाट’; विकास झाला भकास”



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आगामी नगर परिषदच्या निवडणुकित परिवर्तन करण्याचा निर्धार – दीपक ठाकरे_

अनिल पारखी

हिंगणा: वाडी नगर परिषदेतील आगमी निवडणुकीचे डमरू वाजू लागले आहेत. आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्योप सुरु झाले आहेत. अशातच आज मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल पारखी व तालुका संघटक दीपक ठाकरे यांनी नगर परिषदेतील सत्ताधार्यांवर टक्केवारीचा आरोप करत, आगामी निवडणुकीत परिवर्तन करणार असा निर्धार व्यक्त केला आहे.

आगामी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे अनिल पारखी ,दीपक ठाकरे सक्रीय झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी नगर परिषद सत्ताधार्यांवर आरोप करत, सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला.

मनसेचे अनिल पारखी व दीपक ठाकरे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषदेवर सत्ताधारी ची सत्ता होती. परंतु वाडी शहराचा विकास झाला नाही. सत्ताधार्यांनी सत्तेचा वापर स्वतःच्या विकासासाठी केला आहे. वाडी शहर हे नागपूरची शान आहे भारताची उपराजधानी आहे. परंतु या ठिकाणी रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या प्रचंड गैरसोयी आहेत. महिलांना शौचालयांची सोय नाही. येणार्या काळात वाडी शहराचा चा विकास करण्याचा आमचा दृढ मानस आहे.

सत्तापरिवर्तन करण्यासाठी विरोधकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळी .नक्की सर्वजन एकत्रित येतील असा विश्वास आहे. वाडीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये येतात. परंतु त्या निधीची वापर व्यवस्थीत केला जात नाही असेही मत मनसेचे दीपक ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

केवळ टक्केवारी मिळण्यासाठी रस्त्यांची कामे केली जातात. ही कामे निकृष्ठ दर्जाची केली जातात. शहरातील रस्त्यावर गड्याचे नाल्या अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आजही कायम आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचाही प्रश्न गंभीर झाला आहे.

काही लोकांच्या प्लॉट वरून रोड पाडला आहे.सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मूळ मालकांना त्या जागा परत देण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न केल्या जातील. नगर परिषद निवडणूकीमध्ये सर्वपक्षीय विरोधी आघाडी स्थापन करून निवडणुकीला सामोरे जाणार आहे असेही मत मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल पारखी मनसेचे तालुका संघटक दीपक ठाकरे यानी मांडले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles