श्री ईश्वर देशमुख यांचे सिटीझन एज्युकेशन सोसायटी चे कार्यकारी मंडळ अवैद्य मा. धर्मदाय आयुक्तांचा आदेश

श्री ईश्वर देशमुख यांचे सिटीझन एज्युकेशन सोसायटी चे कार्यकारी मंडळ अवैद्य मा. धर्मदाय आयुक्तांचा आदेशपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: सिटीझन एज्युकेशन सोसायटी नागपूर या संस्थेचे दिनांक 07/07/2006 रोजी श्री अरूण देशमुख यांनी दाखल केलेला कार्यकारी मंडळाचा बदल अर्ज केस के 1042 / 2006 मा. धर्मदाय उपआयुक्त नागपूर यांनी दिनांक 30/06/2022 रोजी नामंजुर करून संपुर्ण कार्यकारी मंडळ अवैद्य घोषीत केलेले आहे.

सिटीझन एज्युकेशन संस्थेची स्थापना माजी आमदार सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्थ, स्वातंत्र संग्राम सेनानी स्व. श्री ईश्वरबाबु देशमुख यांनी स्थापन केलेली होती. त्यांनी या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर केले. आज या संस्थेचे नागपूर, कुही, रामटेक, मांढळ येथे अनेक शाळा, महाविद्यालय कार्यरत आहे. मा. श्री ईश्वरबाबु देशमुख हे संस्थेचे कार्याध्यक्ष पदावर कार्यरत असतांना संस्थेची भरभराट झाली. मा. श्री ईश्वरबाबु देशमुख यांचा दिनांक 06/02/2006 रोजी मुत्यु झाला. तत्पुर्वी श्री अरूण देशमुख यांनी संस्था बळकावण्याचे दृष्टीने श्री ईश्वरबाबु देशमुख अवंती हॉस्पीटल मध्ये दिनांक 09/09/2005 ते 20/09/2005 या कालावधीत अती दक्षता विभागात भरती असतांना दिनांक 14/09/2005 रोजी श्री अरूण देशमुख यांनी अवैध रित्या सभा आयोजीत करून मा कार्याध्यक्ष श्री ईश्वरबाबु देशमुख यांची खोटी स्वाक्षरी करून स्वतः ला संस्थेचे नॅमीनेटेड सभासद व सचिव घोषीत केले.. मा. धर्मदाय उपआयुक्त यांनी ही सभा अवैद्य ठरवुन त्यांचे सभासदत्व बोगस व अवैद्य ठरविले.

मा. श्री ईश्वरबाबु देशमुख यांचे मुत्यु पश्चात श्री अरूण देशमुख यांनी स्वाला सचिव व श्री रमेश दुरुगकर यांना अध्यक्ष घोषीत करून मा. धर्मदाय उपआयुक्त यांचे कार्यालयात बदल अर्ज दाखल केला व संस्थेवर अवैद्य रित्य कब्जा केला. या कालावधीत अवैद्य रित्या कर्मचारी नियुक्त्या, आर्थीक व्यवहार, अवैद्य निर्णय घेण्यात आले. संस्थेच्या घटणे प्रमाणे सिटीझन एज्युकेशन संस्था द्वारा संचालीत शिक्षण संस्थेच्या प्राचार्य वा मुख्याध्यापकास कार्यकारी मंडळात एक्स ऑफीसिव्ह मेंबर म्हणुन घेण्यात येत व त्या कर्मचा-याच्या निवृत्ती नंतर ते पद समाप्त होते. श्री अरूण देशमुख हे दिनांक 30/09/2005 रोजी निवृत्त झालेले होते तेव्हा त्यांचे सचिवाचे पद रिक्त झालेले असतांना त्यांना कोणताही अधीकार नसतांना अवैधरित्या सभा बोलावुन नविन कार्यकारी मंडळ तयार केलेत. तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळातील बहुतांशी पदाधीका-यांचे सभासदत्व घटणेच्या नियमानुयार रद्द झालेले होते तर काही पदाधीका-यांचा मृत्यु झालेला होता. अशा स्थितीत फक्त संस्थेचे प्रा. निर्मला कानतोडे व श्री रमनलालजी भट्टड हे दोनच आजीवन पदाधीकारी होते. अशा स्थितीत घटनेच्या नियमानुसार आजीवन सदस्यांना अधीकार प्राप्त होते. परंतु श्री ईश्वरबाबु देशमुख हे हॉस्पीटल मध्ये भरती असतांना श्री अरूण देशमुख यांनी आजीवन सदस्यांच्या विरोधात शडयंत्र रचुन कायदयाचा दुरउपयोग करून अवैधरित्या संस्था बळकावली.

दिनांक 04/06/2006 रोजी निवडणुक घेवुन श्री अरूण देशमुख यांनी मा. सहा. धर्मदाय आयुक्त नागपूर यांचे कार्यालयात सिटीझन एज्युकेशन संस्थेचा बदल अर्ज दाखल केला. या बदल अर्जावर संस्थेच्या आजीवन सदस्या श्रीमती प्रा. निर्मला कानतोडे यांना अॅड. विनय धाबे यांचे माध्यमातुन आक्षेप घेवुन मोठी कायदेशीर लढाई लढली. हस्ताक्षर तज्ञा द्वारा तपासनी अहवालात या बदल अर्जावर घेतलेल्या सहयां खोट्या असल्याचे सिध्द झाले. व त्या आधारावर श्री अरूण देशमुख यांचेवर JMFC कोर्टाने कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles