मेढेखार येथे 9 आगस्ट रोजी मोहरम उत्सव

मेढेखार येथे 9 आगस्ट रोजी मोहरम उत्सव



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सचिन पाटील (अलिबाग)

रायगड:अलिबाग तालुक्यातील मेढेखार गावातील पिरबाबांचा मोहरम सण दि. 9 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्ष मोहरम सण साधेपणात साजरा केला गेला. आता कोराना महामारी दूर झाल्याने मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून पिरबाबांचे भक्त मोहरम सणास येणार असल्याचे मेढेखार ग्रामस्थांनी सांगीतले , खर तर या सणाची सुरूवात पाच दिवस अगोदर होते.

पहिल्या दिवशी आल्याभोवताली पिरबाबांची स्वारी फिरते दुसऱ्या दिवशी सुनरात, तिसऱ्या दिवशी अर्ध्या गावात पिरबाबांची स्वारी फिरते,चौथ्या दिवशी संपूर्ण गावात पिरबाबांची स्वारी फिरते व पाचव्या दिवशी सकाळ आठ वाजल्यापासून भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते पिरबाबा भक्तांच्या हाकेला धावून आल्यामुळे कुणी गुळ,पेढ्यात व फळांनी तुला करून आपले नवस फेडतात दुपारी दोन अडीच नंतर पिरबाबांची स्वारी निघाल्यावर पेढ्यांचा वर्षाव‌ करण्यात येतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles