दलित वस्त्यांमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याची निवेदनाद्वारे मागणी

दलित वस्त्यांमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याची निवेदनाद्वारे मागणीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : दक्षिण पश्चिम विधानसभा बसपा तर्फे आज नागपूर जिल्हा त्याचप्रमाणे विभागीय जिल्हा निवासी अधिकारी मा.विजया बनकर यांना दि.6 ऑगष्ट 22 ला, दुपारी 2 वा. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसाना बद्दल निवेदन देण्यात आले.

त्याचप्रमाणें नागपूरचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनासुद्धा निवेदन दिले. बहुजन समाज पार्टी दक्षिण पश्चिम विधानसभेच्या माध्यमातून रामबाग, इमामवाडा, इंदिरानगर, जाटरोडी, झोन क्रमांक 3 धंतोली अंतर्गत, या दलित आदिवासी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सतत पडलेल्या पावसामुळे शंभर ते दीडशे लोकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी त्यांच्या घरात शिरल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या वसाहतीत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग, हात मजूर वर्ग राहतो. त्यांच्या अन्नधान्याची, लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांचे, कपडे, महत्वाचे कागदपत्र, इत्यादीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीडित कुटुंबांना न्याय देण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष ओपुल तामगाडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात पीडित कुटुंबातील ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेल्यांपैकी बरेचसे कामगार वर्ग सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेश देण्यात आले आणि पीडित वसाहतीमध्ये सर्वे करून विशेष आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले.

याप्रसंगी निवेदन देतेवेळी नवनियुक्त विधानसभेचे अध्यक्ष ओपुल तामगाडगे, उपाध्यक्ष बंडू मेश्राम, महासचिव विशाल बन्सोड, कोषाध्यक्ष अशोक गोंडाणे, सेक्टर अध्यक्ष पंकज नाखले, बसपा कार्यकर्ता सुरेंद्र डोंगरे, रमेश वानखेडे, आदेश रामटेके, सुंदर भलाभी हर्षवर्धन जिभे, आशिष गजभिये, रेखा गजभिये, सुनिता भगत, शशिकला रंगारी, विना वानखेडे, उज्वला वानखेडे, मंदा भगत, संध्या रंगारी, प्रांजली कांबळे, सुमन बागेश्वर, शुभांगी चव्हाण, अश्विनी नाईक, दिपाली तिरपुडे. इत्यादी समस्त पीडित कुटुंबातील महिलावर्ग यावेळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles