…आणि झाला एकदाचा शिंदे सरकार मंत्रिमंडळाचा शपथविधी

…आणि एकदाचा झाला शिंदे सरकार मंत्रिमंडळाचा शपथविधी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: मागील दीड महिन्यापासून सत्तासंघर्षामध्ये आतापर्यंत एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. गेल्या अनेक दिवसांपासून लवकरच हा विस्तार केला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात येत होतं. अखेर आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाची वर्णी लागते याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आता विस्तारानंतर चित्र स्पष्ट झालं आहे.

शिंदेःफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे 11 वाजता पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे. शिवसेनेचे 9 आणि भाजपाचे 9 अशा 18 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

*महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप*

एकनाथ शिंदे- मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) – उपमुख्यमंत्री

*शिवसेनेच्या या मंत्र्यांना शपथ देण्यात आली*

*शिंदे गटातील मंत्री*

तानाजी सावंत
उदय सामंत
संदीपान भुमरे
दादा भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील

*भाजपकडून मंत्री*

गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा

फोटो सौजन्य टी व्ही ९

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles