पांचाळ सुतार बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

पांचाळ सुतार बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- विश्वकर्मा अखिल भारतीय जगनाडे चौक येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पांडुरंग उगवेकर पीएचडी प्रमुख अतिथी कविताताई ईसारकर पोलीस निरीक्षक हुडकेश्वर पोलीस स्टेशन विशेष अतिथी मनीषजी माणूसमारे मुख्य संपादक सुतार पत्रिका नागपूर पंडित शंकरराव देवीकर अध्यक्ष पांचाळ सुतार बहुउद्देशीय संस्था नागपूर ज्ञानेश्वर बाळापुरे सुरेंद्र निलावटकर अरुण वेरुळकर ज्ञानेश्वर पुसदकर राजू नानवटकर गजानन तांदूळकर व सर्व पदाधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला.

सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे विशेष अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विश्वकर्मा यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली नंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी झाड अशा भेटवस्तू सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्राताई नानवटकर यांनी पार पाडले.

विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक कविताताई ईसारकर यांनी दिले दरवर्षी पांचाळ सुतार समाजामध्ये असेच विद्यार्थी भरारी घेऊन सुतार समाजाचे नाव उंच व्हावे असे मोलाचे संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वेळी मोलाची कामगिरी बजावणारे वैशाली बाळापुरे कविता निलटकर चित्राताई नानवटकर कल्पना आसटकर सरिता वेरूळकर योगिता वेरूळकर किशोरी इंगळकर पूजा माहुलकर यांनी अथक परिश्रम घेतले यांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी झाला.

रवींद्र खेडकर यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पांचाळ सुतार बहुउद्देशीय सेवा संस्था अध्यक्ष पंडित शंकरराव देविकर हे गोरगरीब जनतेच्या कामात येणारे एकमेव व्यक्ती अशी त्यांची ओळख गरजू व्यक्तींना आपल्या परीने होईल तेवढी मदत करणे अशी त्यांची ओळख आहे आलेल्या सर्व पाहुण्यांना कार्यक्रम आटोपल्यावर जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles