Home गावगप्पा जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या

जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या

215

जागतीक आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- हिंगणा तालुक्यातील इटेवाही गावामध्ये जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. सविस्तर वृत्त असे की महिन्या भरा पासून सतत च्या मुसळधार पाऊसामुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली व पिके उध्वस्त झाली.त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकतेने खचून गेला याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हिंगणा तालुक्यातील इटेवाही या गावात तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. मृतक शेतकऱ्याचे नाव पांडुरंग मारोती उईके वय ५२ वर्ष असे असून त्याच्याकडे १६ एकर शेती आहे.

शेतातील पीक बघून तो चिंताग्रस्त झाला.आणि शेतातील तन नाशक फवारणी करण्याच्या निमित्ताने तो घरून निघून गेला आणि शेतातच त्याने तण नाशक हे विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवन लीला संपवली या शेतकऱ्याकडे खाजगी व सोसायटीचे ३ लाख रुपयाचे कर्ज आहे.आता पिके उध्वस्त झाल्यामुळे आपण हे कर्ज कसे फेडणार यामुळे त्याने टोकाच पाऊल उचलले त्याच्यामागे ९० वर्ष वय असलेली म्हातारी आई , पत्नी २ मुले व १ विवाहित मुलगी असा परिवार आहे.तालुक्यात प्रथमदा एवढी गंभीर घटना घडूनही आमदार , खासदार , व शासनाचा कोणताही प्रतिनिधी तिथे पोहोचला नव्हता स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आम्ही आदिवासी आहोत म्हणूनच हे लोक आमच्याकडे दुर्लक्ष करतात.

आज वनामती येथे आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक व गुणगौरव सोहळ्याचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलताना म्हणाले की आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.त्यांच्याच नागपूर शहराला लागून असलेल्या हिंगणा तालुक्यात एक आदिवासी शेतकरी आत्महत्या करतो परंतु कोणताही लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी फिरकुनही पाहत नाही ही शोकांतिकाच म्हणावी सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच राजूभाऊ राठोड , माजी ग्रा.प.सदस्य संजय उईके , दिलीप उईके यांनी पीडित परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी केली.