
नागरिकांना संविधानिक न्याय बहाल करा; यशंवत तेलंग
नागपूर: रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चा न्यू कैलास नगर नागपूर यांच्या वतीने संयोजक यशवंत तेलंग यांच्या अध्यक्षतेत जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून मानेवाडा रोड येथील न्यू कैलास नगर येथे भास्कर सूर्यवंशी रहिवाशी असून त्यांना बाजूच्या श्यामराव तिरपुडे (शेजारी) यांच्याघरापासून काही वर्षांपासून खूप त्रास आहे. नेहमीच, वेळोवेळी, भांडण, तंटे, चालत आलेत.
परंतु यावर पोलिसांनी काही त्याच्यामध्ये सहभाग करून दोघांना समजून घेतलेलं नाही. परंतु आज अशी वेळ आलेली आहे की, ते आपल्या सहपरिवारा सह येत्या 15 ऑगस्ट रोजी, राष्ट्रपती महामहीम यांच्या निवासी जाऊन आत्मदहन करणार आहे. तरीसुद्धा या दोन शेजाऱ्याचा भांडणंचा प्राब्लम NMC च्या माध्यमातूनही सुटलेला नाही. काही कागदपत्रे, पत्र व्यवहार, करून सुद्धा काहीही न्याय मिळाला नाही. त्यांच्या मोठ्या परिवारातील भास्कर सुर्यवंशी, लता, साक्षी, अनुष्का, ज्येष्ठ नागरिक आणि सासू-सासरे रामचंद्र पटेल असून खूप त्रासलेले आहे.
शारीरिक, मानसिक व वैद्यकीय त्रास निर्माण झालेला आहे. यावर काय तोडगा निघेल याकरिता परिषदेमध्ये आपला मुद्दा मांडताना आपबिती सांगितली आहे. आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही येथे आलो आहोत. मुद्दा असा आहे, शामराव तिरपुडे शेजारी राहतात. यांच्या घरचा एक्झॉट फॅन त्यांच्या अगदी दारासमोर असून रात्रीच्या वेळी फॅन लावला की यांच्या घरी प्रदूषण तयार करून वाफेच्या द्वारा धूर घरात पसरते व त्यापसून सर्वांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. रात्रीच्या वेळेस त्या फॅन मधून धुराचा असर सगळ्यांवर परिणाम घातक ठरले जाते. आणि त्यामुळे सगळ्यांना शास्व घेतल्या जाऊ शकत नाही त्यापासून अनेक बिमारी तयार झाल्या दवाखान्यात जाणे, सगळं करणे, परंतु डॉक्टरने सांगितले तुमच्यावर प्रदूषणाचा परिणाम झालेला आहे. हे ताबडतोब बंद करा असं त्यांना सांगीतले.
बाजूचे शेजारी तिरपुडे यांना फॅन संदर्भात वेळोवेळी समजावून सांगितले की आमच्या घरी धुराने शरीरावर वाईट परिणाम होत आहे. तुम्ही एक्झॉट फॅन काढा. तरीसुद्धा फॅन काढला नाही. फॅन ला चिमणी लावली नाही. तिरपुडे शेजारी मनमानी काम करत आहे. आखरी एका दिवशी भास्कर सूर्यवंशीने त्याच्या एक्झाट फॅनवर चालू असतांनी पाणी टाकले. त्यानंतर भांडण झाले. शिव्यागाळ झाली धमक्या दिल्या. भांडण गेले पोलीस स्टेशन पर्यंत परंतु अद्यापही त्यांच्यात तोडगा निघालेला नाही. पुन्हा परत शहरांमध्ये होणाऱ्या हत्या, अत्याचार आणि सामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी, तसेच व्हॅलिडीटी, स्कॉलरशिप, ॲट्रॉसिटी यांचे गंभीर प्रश्न शासन प्रशासन् सोडत नाही असे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे याकरिता रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाचे संयोजक यशवंत तेलंग यांनी त्यांना न्याय मिळण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांना सांगितले.