‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत शिक्षकाकडून ५०० रू ची नगद वसुली

‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत शिक्षकाकडून ५०० रू ची नगद वसुली



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अजब फतवा_

यवतमाळ: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अजब फतवा काढत ‘हर घर तिरंगा’ अभियाना अंतर्गत प्रत्येक शिक्षकाकडून ५०० रुपये नगदी स्वरूपात वसुल करण्याचे शासन परिपत्रक यवतमाळ जिल्ह्यात काढण्यात आले आहे. याबाबत शिक्षकांमध्‍ये याविषयीची प्रचंड नाराजी आहे. पण राष्ट्रभक्तीच्या नावाने कुणीही उघड बोलायला तयार नसून, मूग गिळून गप्प आहेत.

एकीकडे ग्रामीण भागात शाळांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत, साहित्य नाही, ग्रामीण भागात अनेक शाळांचे छत गळत आहे. अशा अवस्थेत शिक्षण विभागाने ५०० रुपये तिरंगा निधी वसुलीचे अजब गजब फर्मान काढले आहे. जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून किती निधी गोळा होणार आहे व किती खर्च होणार आहे; याचा कुठेही ताळमेळ नाही. जिल्ह्यात किती घरांवर तिरंगा लावण्यात येणार आहे. त्यासाठी किती खर्च करण्यात येणार आहे. याचा कुठेच तपशील नाही. शिक्षण विभागाने शिक्षणासाठी एखादी योजना आणून त्यावर पैसे खर्च केले असते तर काही तरी परिणामकारक चित्र पहायला मिळाले असते. मात्र तसे होताना अजिबात दिसत नाही.

दुर्गम व ग्रामीण भागातील शाळा दुरूस्तीकरिता वरिष्ठ अधिकारी परिपत्रक काढणार आहेत का? विशेष म्हणजे पाचशे रूपये वसुल हे नगदीमध्ये होत आहेत. या विषयाला शिक्षक संघटनेने विरोधही केला. पाचशे रूपये आमच्या पगारातून घ्या असे देखील शिक्षकांनी वरिष्ठांनी सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी साफ नकार दिला. त्यामुळे जमा होणाऱ्या निधीचा ऑडिट कसे करणार? हा मोठा प्रश्न आहे. शिक्षण विभागाच्या या अजब फतव्याने शिक्षकात नाराजीचा सूर असून शिक्षक संघटनाही यावर बोलायला तयार नसल्याचे चित्र आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles