देशभक्ती किंवा राष्ट्रप्रेम…दिखावा नको.. कृतीत हवे

देशभक्ती किंवा राष्ट्रप्रेम…दिखावा नको.. कृतीत हवेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अर्चना श्रीकांत सरोदे, सिलवासा

साधारण पहीली,दुसरी मध्ये असतानाचा हा प्रसंग.सगळीकडे स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू होती. आमच्या शाळेत माझी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी निवड झाली होती.आईच्या शाळेत ही जास्तीचे काम असल्याने ती घरी आली नव्हती.मी, बहीण व बाबा असे तिघेच घरी होतो. मी राष्ट्रगीत पाठ करायचं म्हणून हातात पुस्तक घेऊन मोठ्याने म्हणायला सुरुवात केली.माझी जेमतेम पहीली ओळ पुर्ण पण झाली नसेल तोच माझ्या गालावर बाबांच्या हाताची पाचही बोटे उमटली. रागाने बाबांनी माझ्या हातून पुस्तक काढून घेतलं. मला काहीच न समजल्यामुळे मी जोरात रडू लागले. थोड्यावेळाने बाबांचा राग शांत झाल्यावर त्यांनी मला जवळ घेऊन समजावून सांगितले की राष्ट्रगीत आपण असं कधीही कुठेही नाही म्हणू शकत. त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान होतो.त्या वयात जेवढं समजवायला हवं तेवढं त्यांनी समजावलं. जसं जशी मोठी होत गेले तसतसे घरातले संस्कार अंगी बाणत गेले. आजही घरी दूरदर्शन वर ध्वजारोहण झाल्यावर राष्ट्रगीत लागलं की घरात सर्वच जण हातातलं काम सोडून उभे रहातात.

एकदा असंच आम्ही ट्रेन मधून प्रवास करत होतो. समोरच्या सीटवर एक लहान मुलगा यु ट्युब वर शाळेचा कार्यक्रम पहात होता. कार्यक्रम संपल्यावर राष्ट्रगीत सूरु झालं.राष्ट्रगीताचे बोल कानावर पडताच आम्ही सर्व उठून उभे राहिलो.दोन सेकंद कोणालाच काही कळलं नाही की आम्ही का उभे राहिलो.नंतर त्याच्या वडिलांना कळलं आणि त्यांनी लगेच मोबाईल बंद केला व त्याला रागावले. मग मी त्या मुलाला जवळ घेऊन राष्ट्रगीताचं महत्त्व समजावून सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्व मुले शाळेच्या युनिफॉर्म वर तिरंगा लावायचीत.मी ही हट्ट करायचे की मला पण हवाय परंतु बाबांनी कधींही घेऊन दिला नाही. ते म्हणायचे की एक दिवसासाठी तो ऐटीत मिरवाल आणि नंतर तो कुठेतरी धुळखात पडेल. त्याचा अपमान झालेला मला चालणार नाही. ते नेहमी म्हणायचे देशभक्ती, राष्ट्रप्रेम आपल्या ह्रदयात असलं पाहिजे तरच ते कृतीत उतरतं.

नुसत्या दिखाव्यासाठी कोणतीही गोष्ट करु नका. तेरा, चौदा वर्षांपुर्वी स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी येताना रस्त्याच्या कडेला असलेले झेंडे मी नेहमीच गोळा करायचे. राग येत असे मला खूप त्यावेळी झेंडे असे कुठेही फेकलेले बघून आणि कोणीही बघून सुध्दा ते उचलण्याची तसदी घेत नसत…परंतु आजची युवा पिढी सजग होत चालली आहे… कॉलेज मधली किंवा शाळेतली मुलं मुली स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी गटा गटाने फिरताना दिसतात रस्त्याच्या कडेला पडलेले झेंडे उचलून घेऊन जातात. अस दृश्य बघीतल की अभिमान वाटतो की माझा भारत देश एक संस्कृती प्रधान देश आहे.आणि ही संस्कृती जपण्याची धूरा आता देशातील युवा पिढीने उचलली आहे.फक्त गरज आहे ती त्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य संस्कारांची…!!

अर्चना श्रीकांत सरोदे
सिलवासा, दादरा आणि नगर हवेली व दीव व दमण

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles