चूक

चूकपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मानव म्हणून जन्म जाहला. हा मानव विविध जातीचा आहे. पण त्याची नाकी,डोळी सारे काही सारखेच आहे. जीवनी येवून उत्तम कार्य करावे ,छान आनंदी जीवन जगावे,कोणास ना दुखवावे या प्रकारे जीवन व्यतीत केले तर सर्व भारत आनंदातच राहील .पण…, प्रत्येक मानवाचा स्वभाव सारखा नसतो. विचार सारखा नसतो. वृत्ती सारखीच नसते. कोण शांत,तर कोण विचारी, कोण लगेचच रिॲक्ट होणारा, कोण वादाचे मुद्दे उचलून तर कोण सुसंवाद साधणारा असतो.
त्यातून वादविवादाला सुरूवात होते आणि येथेच माणसाच्या हातून चुकांचे प्रदर्शन सुरूवात होते. प्रत्येक मानवाच्या हातून एक तरी चूक होतेच. पण तीच चूक पुढच्या वेळी करू नये आपल्यात सुधारणा व्हावी.

पण काही महाभाग असे असतात की त्यांना त्यांची चूक झालीय हेच कबूल करायला जड जाते. त्यात कोणी समजून सांगितले तर त्यालाही दोष देवून रिकामे होतात. माणूस म्हटले की, चूक आलीच पण परत परत चुका करणारा हा एक जाणीवपूर्वक चूक करतो. नाहीतर त्याला इतरांना त्रास देण्यात धन्यता वाटत असावी असे आपण म्हणूया. पण प्रत्येकाने आपल्या झालेल्या चुका सुधाराव्यात.परत आपल्या हातून तीच चूक होणार नाही या कडे लक्ष द्यावे.म्हणजे सर्व सुरळीत चालेल.

अगदी दोनच दिवसांपूर्वी माझ्या वर्गात एका मुलाने तीन मुलींना मारले. मुलींनी माझ्याकडे कम्लेंट केली. मी त्या मुलाला समजावून सांगितले. दोन दिवस वर्गात शांत आहे. त्याला त्याची चूक समजली. मान्य केली. परत मुलींच्या वाटेला गेला नाही. दिसताना हे उदा.अगदी साधे वाटते.पण यातूनच पुढे होणारे संभाव्य धोके लक्षात आणून दिले तर अशी मस्ती वर्गात होणार नाही. असेच आपल्या जीवनातील एक घरगुती उदा:- लग्न झाले अगदीच सतरा वयात.वय लहान सासूबाई खाष्ट.

एकदा माझ्या हातून माझा चहाचा कप विसळायचा राहिला.काॅलेजला जायची घाई,आवरायची घाई. सासूबाई त्यावरून वाट्टेल तशा बोलल्या.मला आईच्या घरी कामाची सवयच नव्हती.मी सर्व शांततेत ऐकले.उलट बोलणे आजही मला जमत नाही.पण एक झाले आज लग्नाला सदोतीस वर्ष झाली तरी स्वतःचा कप विसळायचा विसरत नाही. अशा या छोट्या उदा.तून चूक कबूल करून पुढे कसे जायचे हे सांगितले आहे,आणि तीच चूक जीवनात परत करायची
नाही. हे ब्रीद मनावर कोरायचे.

झालेली चूक परत करू नये
ती सुधारून पुढे जायला शिकावे..

वसुधा नाईक,पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles