रक्षाबंधन

रक्षाबंधनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अनिता व्यवहारे

अखिल विश्वाला शोभून दिसणारी एकच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संस्कृती, ती म्हणजे भारतीय संस्कृती. तिचे पारंपरिक पद्धतीने रक्षण करण्यासाठी आणि ते जोपासण्यासाठी विधात्याने निर्माण केलेली सर्वांगसुंदर कलाकृती म्हणजे स्त्री. तिच्या जीवनाशीच भारतीय संस्कृती व सण-उत्सव निगडीत आहेत आणि जवळ जवळ 50% सण तिच्या रक्षणार्थ करावयाच्या व्रतवैकल्याचे असतात. विधात्याने निर्माण केलेली सृष्टी आणि त्याचा उपयोग घ्यायला त्यानं पाठवलेली ही ललना, की जी निसर्गाला सृजनशील बनविते एवढच नव्हे तर, दया, क्षमा, शांती यांचा मूलमंत्र देणारी, भविष्याला स्वतःच्या ओटीत फुलविणारी, भूत( गत ) काळात पदरात झुलविणारी, वर्तमानाला तारणारी युगंधरा, तेव्हा जरी परमेश्वराचा हेतू निर्मळ होता; पण समाजाने मात्र तिच्या पदकलमात रुढीच्या बेड्या ठोकल्या.

लग्न म्हणजे बंधन नसून तो एक संस्कार आहे. दोन अनोख्या जीवांचे मनोमिलन. पण या संस्कारातूनही स्त्रीचे समर्पणच अपेक्षित. पती म्हणजे आयुष्याचा जोडीदार असे न समजता तो पत्नीचा समाज हक्काचा राखणदार मानला जातो, मंगळसूत्रा सारखे पवित्र दान आंदण करून तिच्या स्वातंत्र्यावर एक बंधन घातले जाते, आणि एवढं असूनही लग्नानंतर पतीने तिची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी तिला त्याच्यासाठी व्रतवैकल्य, उपास-तापास करावे लागतात. वडाला सात फेऱ्या मारून सात जन्म मी यांची सेवा करीन,माझे आयुष्य यांनाच समर्पित करीन, स्वतःच अस्तित्व दाखविणार नाही, तर त्यांच्या अस्तित्वाची जाणिव करून देण्यासाठी कुंकवाचा टिळा कपाळी लावील ही शपथ घ्यावी लागते.

जाई जुई फुलाप्रमाणे लाघवी आणि नाजूक असं तिचं जीवन , नाजूक काया. पण याचं रक्षण करण्यासाठी पती हा एक राखणदार पुरेसा वाटत नाही, म्हणून पुन्हा एक निमित्त रक्षाबंधनाच. हा सण म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचं प्रतिक त्यातूनही रक्षणाची याचना. भावाच्या मनगटावर राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर आहे ही आठवण करून देण्यासाठीचा हा उत्सव. पुढे भाऊबीज ती देखील बहिणीने भावासाठी करावयाचा एक सोपस्कार.

आपल्या संस्कृतीतील हे सर्व व्रत वैकल्ये करणं ठीक आहे. पण ते सर्व स्त्रीनेच पुरुषांसाठी का करावयाची? अरे स्त्री ही पुरुषांची गुलाम नसून भागीदार आहे, साथीदार आहे. इतकंच नाही तर त्याला जन्माला घालण्याचा अधिकार तिचाच आहे. म्हणजेच संपूर्ण विश्वाचा ती मूलाधार आहे, असे असल्यानेच तिचे रक्षण करावे लागतेच ना? पण ती रक्षण करण्याची जबाबदारी समस्त पुरुष वर्गाने स्वतःहून का स्वीकारू नये? आणि तसे नसेल तर तिने सगळी कर्तव्य पार पाडीत असताना जुलुमाचा पिंजरा तोडला आणि आशा आकांक्षाच्या पंखाने उंच उडून गेला तर कुठे बिघडले. पण समाज या गोष्टीला राजी होत नाही.

स्त्री आपल्या रक्षणार्थ व्रतवैकल्ये करते, जिच्याकडून आपण राखी बांधतो फक्त तिचेच रक्षण करायचे का? समस्त स्त्रीवर्गाचाच मी रक्षण कर्ता आहे, अशी जाणीव मनामध्ये ठेवावी, मग काय बिशाद आहे, आम्हा स्त्री वर्गाकडे मान वर करून पाहण्याची. पुरुष वर्गाचा खरा आधार जेव्हा तिला मिळेल तेव्हाच ती म्हणेल,… ‘सुख आले माझ्या दारी काय कमी या संसारी’.

अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles