स्वातंत्रदिनी एलआयसीत देशभक्तीचा हुंकार ; अभिकर्त्यांचा सत्कार

स्वातंत्रदिनी एलआयसीत देशभक्तीचा हुंकार ; अभिकर्त्यांचा सत्कारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : भारतीय आयुर्विमा महामंडळातील (LIC) प्रमुख संघटना अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशन (AIIEA) शी संलग्नित नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनच्या वतीने स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता. ज्येष्ठ विमा कामगार नेते रमेश पाटणे यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकाऊन सामूहिक राष्ट्रगीताने संघटनेचे नेते अनिल ढोकपांडे, वाय.आर.राव, शिवा निमजे, माजी नौसैनिक पी.व्हि. मिलींदकुमार, असंख्य अभिकर्ते व विमा कर्मचा-यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा झाला.

स्थानिक मोहन नगरस्थित सहकार जीवन बिल्डिंग हॅालमध्ये आयोजित या समारंभात वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रणय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्या असंख्य अभिकर्त्यांच्या बळावर एलआयसीने यशाची अनेक शिखरे पादांक्रात केली अशा नागपुर विभागातील १२८ अभिकर्त्यांचा सत्कार प्रशस्तीपत्र, मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यामध्ये संघटनेच्या स्थापना दिन व स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान नागपुर विभागातील अभिकर्त्यांकरीता एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये २५ नविन विमा पॅालीसी करणा-या १२८ अभिकर्त्यांचा समावेश आहे. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते रमेश पाटणे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी, घर्मनिरपेक्ष लोकशाही साकारण्यासाठी व कार्पोरेट धर्मांध हुकूमशाही पासून जनतेला वाचवण्यासाठी संघटनेच्या नेत्रूत्वात आयुर्विमा कर्मचा-यांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पश्चिम क्षेत्रीय विमा कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल ढोकपांडे म्हणाले एलआयसीने देशविकासासाठी आर्थिक योगदानच नव्हेतर विमेधारकांच्या बचतीची सुरक्षा व त्यांवर सुयोग्य परतावा देत नेत्रदीपक प्रगती केली आहे. भविष्यात एलआयसी नवनवीन उच्चांक गाठेल असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संघटनेचे विभागीय सरचिटणीस वाय.आर.राव यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम कर्मचा-यांनी सादर केला. नागपूरातील सुप्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया खराबे यांच्या ….जरा याद करो कुर्बानी गीताने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

डॉ.स्मीता माहूरकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन केले व संगीत सारंग मास्टे यांनी दिले. सर्वश्री अभय पांडे, अभय नाईक, नरेश पाठराबे, लक्ष्मी खर्डेणवीस, संपदा गव्हाणकर आदींनी सुमधुर देशभक्तीगीते सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. या भरगच्च कार्यक्रमाचे संचालन प्रीती पात्रे यांनी तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिवा निमजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यशस्वीतेकरीता सर्वश्री राजेश विश्वकर्मा, जी हरी सरमा, हिना जिभकाटे, संदिप लातूरकर, विवेक जोशी, राजेश खंडेलवाल, नरेश अडचुले, अभय पाटणे, लक्ष्मण मौंदेकर, नरेंद्र उमाळे, सलील मुळे, शोभा मोहपेकर, मुकेश जुमडे, सुरेश शंभरकर, मिलींद पवनीकर, शशी सोनूरकर, दिगांबर वासनिक, नलीनी धनविजय आदींनी सहकार्य दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles