Home गावगप्पा वर्ध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक उज्वलाताई बोढारे यांना निलंबित करण्याची मागणी

वर्ध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक उज्वलाताई बोढारे यांना निलंबित करण्याची मागणी

63

वर्ध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक उज्वलाताई बोढारे यांना निलंबित करण्याची मागणीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अर्चनाताई हरडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा (ग्रा.) सौ. अर्चना यांनी दिली माहिती_

नागपूर: दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रवादीच्या माजी महिला जिल्हा कार्याध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेले आरोप राजकीय अतीमहत्वाकांक्षेने प्रेरित होऊन केलेले आहेत त्या सध्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष नसेन वर्धा जिल्हा निरीक्षक आहेत.

भाजपाचे हिंगणा मतदार संघाचे आमदार यांच्या संपर्कात असून त्याच्या ईशाऱ्यावर सर्व आरोप केलेले आहेत त्यांनी आरोप केले कि, स्थानिक नेतृत्व पक्षात 2 गट निर्माण करुन सोयीचे राजकारण करत आहे परंतू हया स्वतःहा पक्षामध्ये जातीवादी राजकारण निर्माण करुन 2 गट निर्माण करीत आहेत त्यांनी आरोप केला की हिंगणा तालुक्यातील राष्ट्रवादीची काही मातब्बर मंडळी पक्ष सोडून गेलेली होती. परंतु खरी परिस्थिती ही आहे की पक्षातुन गेलेली मंडळी ही माजी महिला कार्याध्यक्ष यांच्या कार्यशैलीवर नाराज होती त्यांना साहेबांनी त्यांच्यापेक्षा वरीष्ठाना डावलून महिला कार्याध्यक्ष बनविल्यामुळे व त्यांना जास्त महत्व दिल्यामुळे नाराज होउन त्यांनी पक्ष सोडला त्याला माजी महिला कार्याध्यक्ष सर्वस्वी जबाबदार आहेत वरिष्ठांनी यांना महिला जिल्हाकार्याध्यक्ष बनवुन ३ विधानसभेची ६ तालुक्यांची जबाबदारी दिली.

परंतु यांनी ६ तालुक्याची साधी कार्यकारीणी बनवली नाही किंवा कधीही ४ वर्षात या त्या तालुक्यात गेल्या सुद्धा नाही तालुका अध्यक्षांच्या नेमनुका केल्या नाही कधी त्या तालुक्यात जाऊन मोर्चे काढले नाही. वरिष्ठांनी काढलेल्या मोर्चात आयत्या वेळी समोर समोर हजर राहुन फक्त फोटो काढणे व निवेदन देणे यापलीकडे यांनी कोणतेही काम केले नाही हिंगणा विधानसभेतून एकही जिल्हाध्यक्ष आजपर्यंत झाला नाही हा त्यांनी केलेला आरोप अत्यंत खोटा आहे माजी जिल्हाध्यक्ष बंग साहेब कोणत्या विधानसभेचे होते ? युवक जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे हे कोणत्या विधानसभेचे होते ? संतोष नरवाडे सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष कोणत्या विधानसभेचे आहेत ? आशीष पुंड युवक जिल्हाध्यक्ष कोणत्या विधानसभेतून येतात?

एका विशिष्ठ समाजाच्या भरोशावर राजकारण करणाऱ्या या महिलेला हे माहीत नाही की मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी बंग साहेबांनी माजी भाजपाचे आमदार विजय घोडमारे यांना पक्षात प्रवेश करवुन आपली तीकीट त्यांना देऊन त्यांना लढवले ते कोणत्या जातीचे होते ? जिल्हा परीषद पंचायत समीतीच्या तीकीट कोणत्या जातीच्या लोकांना देऊन निवडून आणले याची माहीती त्यांनी द्यावी.