‘शोले’ चित्रपटाचे ‘द ग्रेट एडिटर एम. एस. तथा माधवराव शिंदे !!!

‘शोले’ चित्रपटाचे ‘द ग्रेट एडिटर एम. एस. तथा माधवराव शिंदे !!!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भारतातील चित्रपटसृष्टीत १५ ऑगस्टच्या दिवशी शोले रिलीज झाल्याला ४६ वर्ष झाली भावांनो. आमच्या मागच्या पुढच्या दोन जनरेशनला ‘पिच्चर’ म्हंजे ‘शोले’ एवढंच माहीतीय. किती आले किती गेले. शोलेचा नाद नाय करायचा !! आजपन शोले कुठल्याही चॅनलवर लागलेला दिसू दे, पाच मिन्टं तरी चॅनल बदलत नाय आमी !!!

जय, वीरू, बसंती, ठाकूर,बहू, गब्बरसिंग पासून सांबा, रामलाल, मौसी,अहमद,चाचा,कालीया पर्यन्त… अगदी ‘सुनो गांववालोंS’ म्हणत गब्बरचं पत्र वाचून दाखवणारा तो गांवकरी, ‘अरे भई ये सुसाट क्या होता है’ म्हणणारा म्हातारा, मेहबूबा मेहबूबा वर थिरकणारी हेलन, मेंडोलीन वाजवत गाणारा आगा प्रत्येक व्यक्तीरेखेनं मनात घर केलंय…आर.डी.चं संगीत, माऊथ आर्गनचे सूर, रमेश सिप्पीचं डायरेक्शन, रामगढचा भव्य सेट… अग्ग्गदी अहमदची खबर मिळाल्यावर गब्बर हातावर फिरणार्‍या मुंगळ्याला मारतो, तो मुंगळाही ‘नीट’ लक्षातय.

…पण एक माणूस असाय ज्याचा ‘शोले’च्या यशात अक्षरश: सिंहाचा वाटा आहे.. प्रचंड कष्ट आहेत त्याचे शोलेमध्ये..पण तो कायम पडद्यामागं राहीला.. कायम ! तो माणूस मराठी आहे !! द ग्रेट एडिटर एम. एस. तथा माधवराव शिंदे !!!

..खुप कमी जणांना माहिती असेल, ‘शोले’ ला त्या वर्षी ‘फिल्मफेअर’ची ९ नामांकने होती पण ॲवाॅर्ड फक्त एकच मिळालं.. ते माधवरावांना होतं.

ज्यांना त्या काळातल्या अतिशय किचकट एडिटींग पद्धतीविषयी कल्पना नसेल त्यांच्यासाठी सांगतो..शोले सारख्या भव्य ‘कॅनव्हास’ असलेला सिनेमा एडीट करणं हे त्या काळात खायचं काम नव्हतं ! लै जबरदस्त मेहनत केली या माणसानं.. शूट झालेली ती फिल्म होती तब्बल ३००,००० फूट ! सोप्या भाषेत सांगायचं तर ती फिल्म जर सरळ उलगडत रस्त्यावर पसरली तर तब्बल ९२ कि.मी. भरेल. अशा डोंगराएवढ्या राॅ स्टाॅक ची प्रत्येक फ्रेम – प्रति एक फ्रेम – ‘अभ्यासून’, कापून ,जोडली या माणसानं… भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावेल असं काम शिंदेंसारख्या आपल्या मराठी माणसानं केलं. त्यांना पगार होता दरमहा २००० रूपये..

माधवरावांचे कित्येक ‘कट्स’ आजही ‘एडिटींग अभ्याक्रमात’ अभ्यासाला आहेत…दुर्दैवानं या महान माणसाचा अंत अतिशय दुर्लक्षित आणि हलाखीच्या परिस्थितीत झाला…’शोले’ च्या या एका दुर्लक्षित ‘क्रिएटर’ला त्रिवार सलाम !

– किरण माने.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles