न्यू मून स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात

न्यू मून स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया: न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा ज्यु. कॉलेज अर्जुनी/मोर. येथे राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली भावा बहिणीतील स्नेहधागा घट्ट करणारा रक्षाबंधन हा पवित्र सण. आपल्या व इतरांच्या जिवनात पवित्रता व मांगल्य निर्माण व्हावं व निसर्गाचं जतन व्हावं या दृष्टीने न्यू मून इंग्लिश शाळेत राखी पौर्णिमेचे दि. १२/०४/२०१३ रोजी आयोजन करण्यात आलं. या शुभ पर्वावर स्वहस्ते तयार केलेल्या राखींची प्रदर्शनी ठेवण्यात आली. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भाग घेऊन कार्यक्रमाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. या राखी प्रदर्शनीत विविध कल्पकता वापरून विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या.

जो निसर्ग आपल्याला कायमच सर्व काही देत आलेला, त्याचाच एक घटक म्हणजे वृक्ष, ज्याच्यामुळे चराचर सृष्टील चैतन्य निर्माण होऊन तो सर्वांना प्राणवायू प्रदान करतो. अशा या वृक्षाचं जतन व संवर्धन व्हावं, निसर्गाप्रती आपलं नाते अधिक घट्ट हावं म्हणून वृक्षालाही राखी बांधून स्नेह व्यक्त केलं गेलं. विदयार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा उत्साह द्विगुणीत केला गेला.

याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीनी राखी बांधली. या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष आ. यशवंत परशुरामकर सचीव आ.. ओमप्रकाश सिंह पवार, प्राचार्य सचीन मेश्राम,प्रा. कुत्तरमारे प्रा. राकेश उंदिरवाडे, प्रा. तारका रुखमोडे , लीना चचाणे, त्रिवेणी थेर
कुंजना बडवाईक, हिना लांजेवार प्रतिक्षा राऊत, श्री बांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तारका रूखमोडे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles