राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर

राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_राज्य समन्वयक विलास मनोहर, नागपूर जिल्हाध्यक्ष सुदर्शन गोडघाटे, विदर्भ उपाध्यक्षपदी भीमराव लोणारे_

गजानन ढाकुलकर, नागपूर

नागपूर : राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात. नागपूर जिल्हाध्यक्ष पदी सुदर्शन गोडघाटे तर राज्य समन्वयक पदाची धुरा विलास मनोहर यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. विदर्भ उपाध्यक्षपदी भीमराव लोणारे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

या निवडी बाबतची बैठक राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या वाडी येथील कार्यालयात सोमवारी (१५ ऑगस्ट) दुपारी आयोजित करण्यात आली. या कार्यकारीणीत विदर्भ उपाध्यक्ष व नागपूर शहराची जबाबदारी जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यात अग्रणी भीमराव लोणारे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शासकीय अधिस्वीकृती जेष्ठ पत्रकार विलास मनोहर यांची महाराष्ट्र कार्यकारिणीत राज्य समन्वयक पदावर वर्णी लावण्यात आली. तर नागपूर जिल्हाध्यक्षपदी सुदर्शन गोडघाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, संघटनेच्या विस्तारावर चर्चा करण्यात आली.

पद बहाल करताना राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संघपाल गडलिंग यांनी म्हटले की, आपली नव्या उमेदीच्या पत्रकारितेचा उपयोग संघटन बांधणीच्या रूपातून समाज हितासाठी असावा. पत्रकार संघाच्या ध्येय धोरणाशी प्रामाणिक राहून संघटन मजबुतीचे कार्य करावे, असे आवाहन केले.

तसेच काम करीत असताना संघाच्या चौकटीला कुठेही धक्का लागणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. त्यानंतर निवड झालेल्या सदस्यांना नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले. यावेळी सचिव विजयकुमार खवसे, गजानन ढाकुलकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग व सचिव विजयकुमार खवसे यांच्या आदेशानुसार या सर्व नियुक्त्या करण्यात आल्यात. बैठकीला गजानन ढाकूलकर, सौरभ पाटील, प्रवीण गजभिए, प्रमोदकुमार गाडगे, प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles