“एक वादळ भारताचं” या उपक्रमास उदंड प्रतिसाद; अनेकांची उपस्थिती

“एक वादळ भारताचं” या उपक्रमास उदंड प्रतिसाद; अनेकांची उपस्थिती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे हजारो लोकांनी एकसाथ राष्ट्रगीत गायन करून व सांस्कृतिक कार्यक्रम साकारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा केला. एक वादळ भारताचं या चळवळीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिना निमित्त्य एक वादळ भारताचं यांच्या विद्यमाने संपूर्ण हिंगणा वासीयांना १० वाजून ३० मिनिटांनी एकसाथ सामुहिक राष्ट्रगीत गायन करून साजरा करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक हिंगणा येथे सामूहिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ९ वाजता पासून देशभक्ती पर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात ब्रॉडवे डान्स ऍकॅडमी आणि PSD screw नागपुरी अन डान्स ग्रुप , आकार कॉलेज हिंगणा, च्या विद्यार्थ्यांनी डान्स आणि गायन सोबत लोकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमात हिंगणा पोलीस स्टेशनचे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. विशालजी काळे तसेच उपनिरीक्षक मा. श्री. पांडूरंगजी जाधव हे सुद्धा या सोहळ्यामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एक वादळ भारताचं चळवळीच्या ५० स्वयंसेवकांनी पूर्ण नियोजन सांभाळले.

असाच कार्यक्रम संपूर्ण ६ राज्यातून “एक वादळ भारताचं – सामूहिक राष्ट्रगीत” या संकल्पनेच्या माध्यमातून देशभरात ४५० पेक्षा जास्त ठिकाणी लाखो लोकांनी एकसाथ राष्ट्रगीत गायन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला.
नागपूर जिल्ह्यात १५० ठिकाणी  १० वाजून ३० मिनिटांनी ध्वजारोहण व सामुहीक राष्ट्रगीत.

एक वादळ भारताचं – आपला भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यासाठी आणि संपूर्ण देशातील प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक स्थळी राष्ट्रगीत गाण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सुरू केलेली ही चळवळ आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles