
जय शिवराय सहकार समूह म्हणजे सभासदांची आपल्या हक्काची बँक : एकनाथराव पाटील (कंथेवाडीकर)
सुभाष चौगले, कुडूत्री/ प्रतिनिधी
राधानगरी: सामाजिक बांधिलकी जपत सभासदांच्या आर्थिक गरजा प्राधान्याने सोडवणाऱ्या जय शिवराय सहकार समूहाच्या सहकारी संस्था म्हणजे सभासदांच्या आपल्या हक्काची बँका होत असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य भोगावतीचे माजी संचालक एकनाथराव पाटील (कंथेवाडीकर) यांनी केले
कंथेवाडी (ता. राधानगरी )येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जय शिवराय सहकार समूहाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांतर्गत कर्तुत्ववान, गुणी, विधवा महिला सन्मान कार्यक्रमात मान्यवर व्यक्तींचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद तुकाराम नाना पाटील होते. रामचंद्र भोपळे ,बाबुराव पाटील, लहू पाटील, दिनकर पाटील, सौ पद्मा पाटील प्रमुख उपस्थित होते. स्वागत सागर पाटील यांनी केले प्रदीप कदम यांनी प्रास्ताविक केले . विधवा महिला सावित्रीबाई भोसले ,अनुसया पाटील ,सिंधुताई पाटील ,उषा पोवार यांचा व कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी सागर सरावणे, शिक्षक राहुल पाटील ,सौ सुषमा चावरे यांचा माजी सरपंच सौ सुशीला सुतार, सौ.वंदना पाटील ,सौ.सुमन भोपळे ,सौ छाया पाटील, लक्ष्मण पाटील ,नंदकुमार हालके यांच्या हस्ते विविध भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .
संजय पाटील, शाहू पाटील ,तानाजी चौगले सातापा डवर आर.एस पाटील व्ही एस पाटील प्रशांत डवरी भाऊ सुतार सर्व सहकारी संस्थांचे संचालक सभासद कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते तानाजी पाटील यांनी आभार मानले .