🇮🇳देशभक्तीचे प्रेरणास्त्रोत ‘राष्ट्रगान’🇮🇳

🇮🇳देशभक्तीचे प्रेरणास्त्रोत ‘राष्ट्रगान’🇮🇳पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🇮🇳जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे.हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचले होते.याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे.भारतो भाग्यो बिधाता या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला.*

राष्ट्राचे गीत….
आपल्या मनातील राष्ट्र प्रेमाचा स्वर….
राष्ट्राचा मानबिंदू….

*🇮🇳रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले हे सुंदर स्वर राष्ट्रगीता विषयी ते म्हणाले होते “प्रगती, अधोगतीमुळे ओबडधोबड बनलेल्या मार्गावरून युगांन युगे प्रवास करणाऱ्या यांत्रिकाचा जो चीरसारथी जन गणांचा,जो अंतर्यामी आणि मार्गदर्शक, अशा त्या भारत भाग्यविधात्याचाही या गीतात जयघोष केलेला आहे. अशा या राष्ट्र गाण्याचा अर्थही खूप गहण आहे..*

जन-गण-मन अधिनायक जय है
भारत भाग्य विधाता
तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस
भारताचा भाग्योदय करणारा आहेस.
तुझा जयजयकार असो!

पंजाब सिंध गुजरात मराठा
द्राविड उत्कल बंग।
पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, द्राविड म्हणजे दक्षिण भाग, उत्कल म्हणजे आताचा ओडिशा, बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो.

विंध्य हिमाचल यमुना गंगा,
उच्छल जलधितरंग।
विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं. गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.

तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मांगे;
गाहे तव जय गाथा।
जन-गण मंगलदायक जय है,
भारत-भाग्य-विधाता।
हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात.
तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.

जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय है।।
तुझा जय जयकार. त्रिवार जयजयकार.

*🇮🇳भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम हे गीत सार्वजनिकपणे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे.*

*🇮🇳खरंतर पाच कडव्यांपैकी केवळ पहिलेच कडवे आपण गातो. 52 सेकंदात राष्ट्रगीत पूर्ण करणे बंधनकारक आहे 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने याचा स्वीकार केला तेव्हापासून आजपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात याचा निनाद गुंजत आहे. आजही अख्या महाराष्ट्रात सकाळी 11 वाजता सर्वांनी राष्ट्रगान गायले. सर्व गातात तर मराठीचे शिलेदार समुहाची कवीकवयित्री कसे बरे मागे राहतील.*

*🇮🇳आज बुधवारीय काव्य रत्नस्पर्धेसाठी समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी राष्ट्रगान हा विषय देवून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य उत्सवात जणू नवचैतन्य आणले. या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे. समूहातील सर्व कवी आणि कवयित्रीचा प्रयत्न उल्लेखनीय होता. यानिमित्ताने राष्ट्रगानाच्या आठवणींना उजाळा मिळाला. तुम्हा सर्व कवी कवयित्रींचे मनापासून अभिनंदन. असेच लिहून व्यक्त होत राहा. समूहाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या संधीचं सोनं करूया व भारतभूमी प्रति सदैव कृतज्ञतेची भावना मनात जोपासूया हाच आजचा संदेश.*

सविता पाटील ठाकरे सिलवासा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles