Home गावगप्पा भाजप आणि राष्ट्रवादीत खडाजंगी

भाजप आणि राष्ट्रवादीत खडाजंगी

64

भाजप आणि राष्ट्रवादीत खडाजंगी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अहमदनगर -कोपरगाव शहरात उभारण्यात आलेल्या कमानीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी रात्री कमालीचा राडा झाला. दोन्ही गटात वाढत चाललेली धुसफुस पाहता अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून वादग्रस्त कमान नगरपालिका व पोलिसांनी काढून टाकल्याने या वादावर पडदा पडला. या राड्यात पोलीस निरीक्षक जखमी झाले असून मुख्याधिकाऱ्यांचा रक्‍तदाब वाढला होता.

या घटनेची पोलिसांकडुन मिळालेली माहीती अशी की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मुख्य रस्त्यावर काळे व कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरु केली. दहीहंडी उत्सवाच्या पुर्व तयारीसाठी काळे गटाचे कार्यकर्ते विविध ठिकाणी फलक व कमान उभाण्यास सुरुवात केली. कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील काळे गटाने उभारलेली कमान आमच्या दहीहंडी उत्सवाला अडथळा निर्माण करणारी आहे, असे म्हणत त्या कमानीवर आक्षेप घेतला. व ही कमान काढण्याची तक्रार पालिका व पोलीस प्रशासनाकडे केली.

प्रशासनाने दोन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मंगळवारी दिवसभर समजावू सांगण्याचा प्रयत्न केला होते. उभारलेली कमान कोल्हे गटाच्या सांगण्यावरुन काढावी लागते असा समज करुन ती कमान फक्त प्रशासनाच्या सांगण्यावरुन उद्या काढु पण कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले व इतर पदाधिकाऱ्यांनी घेतला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणुनबुजून विनापरवाना कमान उभी करुन आम्हाला अडथळा निर्माण केला आहे. ती आत्ताच्या आत्ता काढण्याचा हट्ट भाजपचे दत्ता काले, पराग संधान यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने कमानीचा वाद कमालीचा चिघळला.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता सुरु झालेला हा वाद दिवसभर सुरु होता. अनेक चर्चा झाल्या पण कोणीच मागे हटेना. घोषणाबाजी, ढकला ढकली, आरोप प्रत्यारोपाने संपूर्ण दिवस तणावात गेला. अखेर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सायंकाळी पाच वाजता शिघृकृती दलाची पोलीस तुकडी मागवली. पोलिसांचे वाढते संख्याबळ आणि होणारा वादविवाद पाहुन नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्याधिकारी बाहेरगावी असल्याने वाद मिटत नव्हता.

अखेर मुख्याधिकाऱ्यांनी नाशिक येथुन तातडीने कोपरगाव गाठले. मुख्याधिकाऱ्यांची अगोदरच प्रकृती खराब असल्याने ते नरमगरम होते. अशातच दोन्ही गटातील कार्यकर्ते मुख्याधिकाऱ्यांसमोर आक्रमक होत वादविवाद सुरु असल्याचे पाहुन मुख्याधिकाऱ्यांनी समजावून सांगुनही कोणीही न ऐकल्याने मुख्याधिकाऱ्यांचा रक्तदाब वाढला.