

रविवारी कढईपूजा व महाआरती
नागपूर: श्री नागद्वार स्वामी अन्नदान वस्त्रदान सेवा मंडळ तर्फे आज पत्रपरिषद घेण्यात आली यावेळी गजानन इंदुरकर यांनी सांगितले की 21 ऑगस्ट रोजी रविवारी मंडळाची कडई पूजा व महाप्रसाद सकाळी ७ वाजता महाआरती ७:३० वाजता. समाजसेवा रत्न पुरस्कार सन्मान व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण व महाप्रसाद वितरण होईल. ते परमपूज्य श्री संत राम सुमेर बाबा आश्रम शांतीनगर नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती दिली. यावेळी अध्यक्ष मुरलीधर नागपुरे हरिहर बंडोले, मनोज कढे, नितीन पडोळे, कुंदनसिंग बैस, महेंद्र लांजेवार, प्रेमराज कावळे, पंकज मुरकुटे, ईश्वरचंद जैन, गजानन अंतुरकर यावेळी उपस्थित होते.