Home ताज्या घटना परांजपे हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी फी न भरलेल्या मुलांना प्रांगणात उभे ठेवले

परांजपे हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी फी न भरलेल्या मुलांना प्रांगणात उभे ठेवले

202

परांजपे हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी फी न भरलेल्या मुलांना प्रांगणात उभे ठेवले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: परांजपे हायस्कूल बजाज नगर नागपूर येथील वर्ग आठवी नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना शाळेची फी भरली नाही म्हणून त्यांना वर्गात बसू दिले नसल्याचे वृत्त पुढे आले आहे.

तसेच वर्ग नववी तील विद्यार्थ्यांचे दिनांक 18. 8. 22 रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु नववी तील ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना शाळेचे मुख्याध्यापक निलेश बावनकुळे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवून त्यांना शाळेच्या प्रांगणात उभे ठेवले होते. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सदर माहिती गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिली तेव्हा पालकांच्या विनंती वरून गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांसह शाळेत भेट दिली व मुख्याध्यापक साहेबां सोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्येचे निवारण केले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी बाहेर प्रांगणात उभे केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.

उपरोक्त शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा चे शहराध्यक्ष सतीश नाईक यांच्या अध्यक्षतेत राम भलावी, यशवंत कोकडे, सेवकराम टेकाम, अरुण जुगनाके, सतीश डोंगरवार, राजेश उईके, मंगेश धुर्वे, चेतन परतेकी, आणि सदस्यांमध्ये सीमा श्रीराम, अर्चना मानकर, प्रतिभा मडावी, सिनेक्षा श्रीराम, श्रुती मडावी, तसेच कार्यकर्ते प्रदीप मसराम व दशरथ मसराम यावेळी उपस्थित होते.