‘टीच फॉर इंडिया’च्या सहकार्याने शाळांमध्ये गुणवत्तावाढीचा उपक्रम

‘टीच फॉर इंडिया’च्या सहकार्याने
शाळांमध्ये गुणवत्तावाढीचा उपक्रम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे – ( प्रतिनिधी)- पुणे शहरातील महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ‘टीच फॉर इंडिया’ ही संस्था सहकार्य करीत असून अनेक प्राथमिक शाळांमध्ये या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचे उपक्रम सुरू आहेत.

या उपक्रमा संदर्भात येत्या दशकात पुणे शहरातील शाळांमध्ये शिक्षणाबाबत एकूण दृष्टीकोन, त्याबातची उद्दिष्टे, ती उद्दिष्टे पूर्ण करण्यात येणारे अडथळे, त्याच प्रमाणे शिक्षण कार्यक्षेत्रात या उद्दीष्टपूर्तीसाठी आणखी काय करता येईल या मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा करण्यासाठी नुकतेच एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. TFI संस्थेच्या दिल्लीतील सीईओ श्रीमती शाहीन, दिल्ली बालहक्क संरक्षण समितीचे चेअरमन श्री. अनुराग कुंडू यांनी ह्या चर्चासत्राचे आयोजन केले होते.

‘थरमॅक्स हाऊस’ येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात थरमॅक्स कंपनीच्या संचालक श्रीमती अनु आगा,खासदार वंदनाताई चव्हाण, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप खोत, पुणे मनपाच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती रंधवे शिक्षक प्रतिनिधी,साक्षी सोहोनी, या क्षेत्रातील अनेक समन्वयक, विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांची विशेष उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles