नागपुरात १४१ वर्षाची परंपरा लाभलेली मारबत – बडग्याची मिरवणूक आज

नागपुरात १४१ वर्षाची परंपरा लाभलेली मारबत – बडग्याची मिरवणूक आज



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहराला १४१ वर्षाची परंपरा लाभलेल्या मारबत व बडग्याची मिरवणूक दि २७/०८/२०२२ रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातून निघणार आहे. पन्नास खोके…सब कुछ ओके… ही घोषणा सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार गाजत आहे. त्यावरच टिप्पणी करणारा बडग्या उद्या शनिवारी निघणाऱ्या मारबत-बडग्या मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे निघू न शकलेली विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली ही मिरवणूक उद्या शनिवारी सकाळी १० वाजता मस्कासाथ येथून निघणार आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात ५० खोक्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरच भाष्य करणारा बडग्या छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीतर्फे काढण्यात येणार आहे. लालगंज खैरी पुरा येथील युवाशक्ती बडग्या उत्सव मंडळाकडून महागाई आणि जीएसटीचा विरोध करणारे बडगे काढण्यात येणार आहेत.

खैरीपुरा बडग्या मंडळाकडून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा तर मासूरकर चौकातील बडग्या उत्सव मंडळाच्यावतीने राज्यात चर्चेचा विषय असलेल्या फुटीर नेत्यांचा बडगा निघणार आहे. या शिवाय १४१ वर्षांची परंपरा असलेली काळी व १३७ वर्षांची परंपरा असलेली पिवळी मारबत मिरवणुकीत राहणार आहे. काळी व पिवळी मारबत मस्कासाथ परिसरात येऊन तेथे दोन्हीची गळाभेट झाल्यानंतर शहीद चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. त्यानंतर बडकस चौक, महाल, केळीबाग, गांधीगेट, गांजाखेत मार्गे नाईक तलाव येथे त्यांचे विसर्जन केले जाते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles