Home गावगप्पा ओबीसी बहुजन महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी प्रकाश काळे गुरुजींची निवड

ओबीसी बहुजन महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी प्रकाश काळे गुरुजींची निवड

55

ओबीसी बहुजन महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी प्रकाश काळे गुरुजींची निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा- – ओबीसी बहुजन महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष
प्रा. राजकुमार घुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या सभेत ओबीसी बहुजन महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर हिंगणा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे गुरुजी यांची एकमताने निवड करण्यात आली.

या नियुक्तीबद्दल हिंगणा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती .शालिनी मनोहर यांनी काळे गुरुजींचा सत्कार केला.याप्रसंगी हिंगणा तालुक्यातील ज्येष्ठ-पत्रकार गजानन ढाकुलकर ,विनायक इंगळे उपस्थित होते. महासंघाच्या वर्तमान व भविष्यातील येणाऱ्या अडचणी व आव्हाने या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष प्रकाश काळे यांचे ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
प्रा. राजकुमार घुले,राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ.श्वेताताई राहागंडाले,सचिव मीराताई भोयर, विदर्भ अध्यक्ष महेंद्र कुँवारे,नागपूर जिल्हा अध्यक्ष सेवक उईके , शहराध्यक्ष राहुल वंजारी,सुरेश ढोले,अरुण वरठी व वसंत आसटकर यांनी काळे गुरुजींचे अभिनंदन केले. भविष्या मध्ये महासंघाला कधीही राजकीय स्वरूप येऊ देणार नाही तसेच महासंघाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेऊन त्यांची ओळख निर्माण कशी होईल यासाठी आपन सर्व प्रयत्न करू असे या प्रसंगी प्रा. राजकुमार घुले यांनी आश्वासन दिले.