बाबरी मशीद व गुजरात दंगलीचे खटले बंद होणार; सर्वोच्च न्यायालय

बाबरी मशीद व गुजरात दंगलीचे खटले बंद होणार; सर्वोच्च न्यायालय



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_प्रशांत भूषणचाही खटला बंद_

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय घेत बाबरी मशीद विध्वंस आणि गुजरात दंगलीशी संबंधित खटले बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गुजरात दंगलीशी संबंधित खटले निष्फळ ठरत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यापैकी बहुतांश प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. याशिवाय बाबरी मशीद पाडण्याशी संबंधित अवमान खटलाही बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनाही आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण यांच्याविरोधात दाखल केलेला अवमान खटला बंद केलाय.

2009 मध्ये तहलका मासिकाला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रशांत भूषण आणि पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर अवमानाचा खटला सुरू होता, तो आता बंद करण्यात आलाय. भारताचे 16 माजी सरन्यायाधीश भ्रष्ट असल्याचं प्रशांत भूषण यांनी म्हटलं होतं.

न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी प्रशांत भूषण यांची बाजू मांडणारे अधिवक्ता कपिल सिब्बल म्हणाले, या प्रकरणी माफी मागितली आहे. यानंतर न्यायमूर्तींच्या खंडपीठानं सांगितलं की, ज्या लोकांनी अवमान केला आहे त्यांनी दिलेली माफी लक्षात घेता, आम्ही अवमानाची कारवाई पुढं जाणं आवश्यक मानत नाही. ही अवमानाची कारवाई बंद केली जाते, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles