

ताज महालाचे नाव बदलणार; ‘तेजो महालय’ करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार
आग्रा: मागील साडेचार वर्षांत ताजनगरीतील 80 हून अधिक रस्त्यांची आणि चौकांची नावे बदलणाऱ्या आग्रा महापालिकेत ताजमहालचे नाव बदलून तेजो महालय करण्याचा प्रस्ताव आणला जाणार आहे. ताजगंजचे भाजप नगरसेवक शोभाराम राठोड आज दुपारी 3 वाजल्यापासून होणाऱ्या महापालिका सभागृहाच्या अधिवेशनात हा प्रस्ताव मांडणार आहेत.
नगरसेवक राठोड यांचे म्हणणे आहे की, त्यांनी ठराव क्रमांक 4(7) मध्ये याबाबत अनेक तथ्ये मांडली असून, त्या आधारे नाव बदलण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला जाईल. मुगल रोड, घाटिया आझम खान यासह अनेक रस्त्यांची नावे, चौकांची नावे बदलण्यात आल्याचे नगरसेवक शोभाराम राठोड यांनी सांगितले. त्यामुळे आता वेळ आली आहे की ताजमहालचे नावही बदलून तेजो महालय करावे. ऐतिहासिक तथ्ये ते सभागृहात ठेवतील आणि नाव बदलासाठी समर्थन मागतील.