सिल्वासा येथे उपमुख्याध्यापक, शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

सिल्वासा येथे उपमुख्याध्यापक, शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सिल्वासा : दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून लज्जास्पद बातमी समोर आली आहे. सिल्वासा केंद्रशासित प्रदेशात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर उपमुख्याध्यापक आणि एका खाजगी शाळेच्या शिक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.

या घृणास्पद कृत्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला याबाबत कोणाला सांगितल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक आरपी मीणा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 376(2)(एफ)(एन) (अल्पवयीन मुलीवर बलात्कार), 376 डी (सामूहिक बलात्कार), 377 (अनैसर्गिक) अंतर्गत सिल्वासा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीसह 506(2) (गुन्हेगारी धमकी) आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी उप मुख्याध्यापक आणि शिक्षिकेने शाळेत अनेकदा लैंगिक अत्याचार केले आणि या घटनेबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. 29 ऑगस्ट रोजी या प्रकरणात एफआयआर नोंदविण्यात आला होता आणि पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

दोन्ही आरोपींना त्याच दिवशी अटक करण्यात आली आणि त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मीणा यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत आणि ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील. या घटनेत अन्य कोणत्या शिक्षकाची भूमिका आहे का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित खासगी शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील, असा आदेश केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने मंगळवारी जारी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles