नागपुरात तलावाच्या काठावर फेकले ४ हजार राष्ट्रध्वज

नागपुरात तलावाच्या काठावर फेकले ४ हजार राष्ट्रध्वज



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_फडणविसाच्या शहरात तिरंग्याचा अपमान_

नागपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील कोराडीपासून काही अंतरावरील कोराडी तलावालगत असलेल्या नांदा परिसरात चार बोऱ्यांमध्ये हजारो राष्ट्रध्वज टाकून दिल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे एका बोऱ्यावर मौदा पंचायत समिती असे लिहिले असून हर घर तिरंगा मोहीम पार पडल्यानंतर कोणीतरी बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी किंवा पुरवठादाराने अशा पद्धतीने राष्ट्रध्वज तलावाच्या काठावर टाकले आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रध्वजाच्या अपमान केल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी टाकून देण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांची संख्या ३ हजार ९६५ एवढी आहे. केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याचा महोत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात आली. त्यावेळी देशातील कोट्यावधी लोकांनी घरावर राष्ट्रध्वज फडकवले. त्याकाळात अनेकांना राष्ट्रध्वज देखील उपलब्ध झाले नव्हते.

हर घर तिरंगा मोहिमेनंतर नागपूरमध्ये चार हजार ध्वज तलावाच्या काठावर फेकून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नागपूरच्या कोराडी तलावाजवळील नांदा परिसरात हा प्रकार दिसून आला आहे. चार बोऱ्यांमध्ये हजारो राष्ट्रध्वज टाकून दिल्याचे समोर आले आहे.

नुकतंच शासनाच्या निर्देशाप्रमाणे हर घर तिरंगा मोहीम पार पडली. देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकारने देशातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावे यासाठी ही मोहीम आखली होती. प्रत्येक कुटुंबाला राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रध्वज माफक किमतीत लोकांना उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान ठेवला नसल्याचे समोर आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles