‘परततोय मी’ विजेत्या चित्र चारोळीकारांच्या रचना

*परततोय मी*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सरीवर सर बरसल्या
काळ्या आईला भिजण्यासाठी
परततोय मी बळीराजा
भरघोस पिक येण्यासाठी

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💦〰️💦➿➿➿➿
*परततोय मी…!*

धो धो पावसाच्या धारांनी
बरसून आता घेतोय मी
चाकरमाण्यांची पाहून धावपळ
लवकरच आता परततोय मी….

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿💦〰️💦➿➿➿➿
*परततोय मी*

माझ्या अवकाळी बरसण्यानं
जनजीवन विस्कळीत झालं
परततोय मी हे पाहण्यानं
तुमचं मन आनंदून गेलं

*सौ संगिता साळुंखे*
ता जि सातारा
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦〰️💦➿➿➿➿
*परततोय मी*

*परततोय मी पृथ्वीवासींनो*
*जाईन कोटा पूर्ण करुनी*
*पुढील वर्षी बरसेल नक्की*
*तुम्हा हे आश्वासन देऊनी*

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦〰️💦➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी तसेच साहित्यगंध पुरस्कारासाठी नाव नोंदणी करूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*परततोय मी*

*परततोय मी*
*असा बेभान होऊन*
*आलोय मी*
*पुन्हा पावसाळा घेऊन*

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿💦〰️💦➿➿➿➿
*परततोय मी..*

परततोय मी द्या मज आता निरोप
लहरी मी असा करू नका आरोप
वादा आहे माझा
येईल पुढल्या वर्षी परत

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💦〰️💦➿➿➿➿
*परततोय मी*

परततोय मी
आश्वासन अस देवू नको
वारंवार आस दावुनी
जीवास घोर लावु नको

*सौ.भावना अजय ईटकिकर*
हिंगणघाट
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦〰️💦➿➿➿➿
*परततोय मी..*

मानव निर्मित प्रदूषणाचे परिणाम भोगत
बेभान होऊन धो धो बरसतोय मी
पण व्हा सावध ,बळीराजाच्या हाकेला धावत
परततोय मी ‌‌…*परततोय मी*

*शैला शिंदे*
*निरा ता पुरंदर जि पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦〰️💦➿➿➿➿
*परततोय मी*

*जातो जातो म्हणता म्हणता*
*पुन्हा परततोय मी*॥
*निघता निघत नाही पाय माझा*
*पुन्हा पुन्हा बरसतोय मी*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💦〰️💦➿➿➿➿
*परततोय मी.*

*तुम्हाला चिंब करण्यास*
*मनाला गारवा देण्यास*
*जाता जाता भेटण्यास*
*परततोय मी.*

*प्राजक्ता आर खांडेकर, नागपूर*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार* *समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles