Home गावगप्पा डॉ. किशोरी पाचभाई यांची आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कारासाठी निवड

डॉ. किशोरी पाचभाई यांची आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कारासाठी निवड

99

डॉ. किशोरी पाचभाई यांची
आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कारासाठी निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या डॉ किशोरी पाचभाई मागील 25 वर्षापासून वंध्यत्व चिकित्सा करीत आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील रुग्ण यासाठी येतात आणि 95% रुग्णांना याचा फायदा झालेला आहे.

लग्न होऊन 2 ते 14 वर्ष झाले पण ज्यांना मूलबाळ झाले नाहीत असेही रुग्ण यात आहेत. त्या व्यसनमुक्ती साठी समुपदेशन केंद्र चालवितात यात बर्‍याच रुग्णांना फायदा होऊन त्यांचे जीवन पुन्हा सुरळीत झाले आहे.

डॉ किशोरी यांच्या क्लिनिक मध्ये DOT चे केंद्र आहे यात टिबी च्या रूग्णांना मोफत औषधोपचार आणि त्यांचे मानसिक समुपदेशन केल्या जाते. रुग्णांचे पूर्ण समाधान हेच माझे ध्येय असल्याचे डॉ किशोरी पाचभाई सांगतात.

त्या इतरही समाजसेवा व रूग्णोपयोगी काम करीत आहे, रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात. त्यांची यंदाच्या आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे आयोजक अमोल जाधव यांनी जाहीर केले आहे.