पुण्यात भेसळयुक्त पनीर उत्पादन; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

पुण्यात भेसळयुक्त पनीर उत्पादन; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाईपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: पुण्यातील कोंढवा बुद्रुकच्या
टिळेकरनगर परिसरात ‘ मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स’ या कारखान्यात भेसळयुक्त पनीर उत्पादन होत असल्याची खबर मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून २२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार दि.५ सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या कारखान्यांवर कारवाईच्या मोहीमोतील ही आताची तिसरी कारवाई झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने संबंधित कारखान्यावर छापा टाकला त्यावेळी अस्वच्छ परिस्थितीत दूध पावडर आणि पामोलिन तेलाचा वापर करुन बनवलेले बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर आणि पामोलिन तेल साठा आढळून आले. या साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. रू. २,३९,८०० किंमतीचे १,१९९ किलो पनीर, रू.१८,७१, ६५२ किंमतीचे ४,७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर, रू. १,५३,६७५ किंमतीचे १, ०४८ किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण रू.२२,६५,२१७ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

पनीर हा दुग्धजन्य पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. घेतलेले नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमलसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील सहायक आयुक्त रुपाली खामणे, अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगपात व सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सणावारांच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन नकली व भेसळयुक्त अन्न पदार्थ विक्री होण्याचे प्रमाण वाढले असून अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाच्या पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले असून नागरिकांनी न घाबरता या आवाहनाला प्रतिसाद द्यावा कारण तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी खात्री देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles